Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Chalisgaon : चाळीसगावात भररस्त्यावर मुलीची छेडछाड
    क्राईम

    Chalisgaon : चाळीसगावात भररस्त्यावर मुलीची छेडछाड

    saimatBy saimatMarch 25, 2026Updated:March 25, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भरदिवसा चौकात शाळकरी मुलीची छेडछाड आरोपीवर गुन्हा दाखल

    साईमत / चाळीसगाव  / प्रतिनिधी

    शहरातील गजबजलेल्या नेताजी चौकात भररस्त्यावर एका अल्पवयीन शाळकरी मुलीची छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध विनयभंगासह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १५ वर्षीय पीडित मुलगी ही शहरातील एका नामांकित हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. मंगळवारी (दि. २४) दुपारी सुमारे १२:३० वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ती पायी आपल्या ओझर गावाकडे निघाली होती. दरम्यान, नेताजी चौकातील महादेव मंदिराजवळ ती पोहोचताच, तेथे आधीपासून दबा धरून बसलेल्या संशयिताने तिचा पाठलाग करत तिला गाठले.

    राजेंद्र महेंद्र पाटील (वय २५, रा. ओझर, ता. चाळीसगाव) असे संशयित आरोपीचे नाव असून, त्याने अचानक मुलीजवळ येत तिच्या अंगावरील ओढणी बळजबरीने ओढली. या प्रकारामुळे मुलगी क्षणभर घाबरली; मात्र तिने धैर्य दाखवत तत्काळ आरडाओरड सुरू केली. तसेच “मी घरी फोन करून तुझे नाव सांगते” असा इशाराही तिने आरोपीला दिला. मुलीचा आक्रमक पवित्रा पाहून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

    या घटनेनंतर पीडित मुलीने धैर्याने पुढे येत पोलिसांत तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री ११ वाजता आरोपीविरुद्ध विनयभंग तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण बाविस्कर करीत असून, आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, भरदिवसा गजबजलेल्या चौकात घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Kolhapur : व्यापाऱ्याची कार अडवून अडीच लाखांची लूट; चार अज्ञात आरोपी पसार

    March 25, 2026

    Jalgaon : चोरीच्या संशयावर तरुणावर प्राणघातक हल्ला

    March 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.