Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Navapur:भीषण अपघात! पानबारा येथे बोलेरो पलटी, पाच मजूर जखमी
    क्राईम

    Navapur:भीषण अपघात! पानबारा येथे बोलेरो पलटी, पाच मजूर जखमी

    saimatBy saimatMarch 22, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Navapur: Fatal accident! Bolero overturns in Panbara, five laborers injured
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धुळे–सुरत महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवास बनला धोक्याचा, नागरिकांनी केला आवाज

    साईमत  नवापूर  प्रतिनिधी

    धुळे–सुरत महामार्गावरील पानबारा परिसरात आज सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. एमएच 06 बीई 3640 क्रमांकाची बोलेरो गाडी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली, ज्यात पाच मजूर जखमी झाले.

    मिळालेल्या माहितीनुसार, जामोद येथील मजूरांना बडोद्याकडे कामासाठी घेऊन जात असलेल्या या बोलेरो गाडीचा अचानक एका खोल खड्ड्यात आदळून चालकाचे नियंत्रण सुटलं. अपघात इतका अचानक झाला की प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.

    जखमींची नावे: राजेश चिमण भोसले (वय 55),कृष्णा देवा पवार (वय 23),प्रतिमा पवार (वय 20),कल्पना भोसले (वय 40),वास्तव पवार (सर्व रा. जामोद, ता. साक्री)

    स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमींना बाहेर काढले व प्राथमिक मदत केली. तत्पश्चात 1030 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पायलट अजय गावित, हेल्पर कल्पेश गावित आणि डॉ. डिकेश गावित यांनी त्वरित मदतकार्य करत सर्व जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

    अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक तपासात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हा अपघात झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    स्थानिकांनी महामार्गाच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अन्यथा मोठ्या अपघातांची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Bhusawal:साकरीत पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारू पकडली

    March 22, 2026

    Chop : घरगुती त्रासाचा फटका भावाने भावाचा दगडाने ठेचून खून केला

    March 22, 2026

    Bhusawal:प्रेमविवाहाचा संताप भुसावळात तरुणावर अमानुष अत्याचार

    March 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.