Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जामनेर»Shendurni : शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य लोकार्पण
    जामनेर

    Shendurni : शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य लोकार्पण

    saimatBy saimatMarch 15, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Shendurni: Grand inauguration of the equestrian statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Shendurni
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणला

    साईमत/शेंदुर्णी/ प्रतिनिधी,

    शेंदुर्णी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी दणाणून गेला.

    भव्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल, तहसीलदार नानासाहेब आगळे, तसेच नगरसेवक संजय गरुड, शरद बारी, जितू पाटील, जे.के.चव्हाण, कमलाकर पाटील, प्रदीप लोढा, अरविंद देशमुख, दीपक तायडे यांसह छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे सदस्य उपस्थित होते.

    पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण शेंदुर्णी परिसर उजळून निघाला. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली, तर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी ऐतिहासिक वातावरण निर्माण केले. इतिहासात प्रथमच शेंदुर्णीत अशा मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमींचा जनसागर उसळला.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी केले, तर सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले. नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल म्हणाले, “गेल्या ४०-५० वर्षांपासून शेंदुर्णीकरांची छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी होती. मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारामुळे हे स्वप्न साकार झाले आहे.” त्यांनी शेंदुर्णी फ्रुटसेल सोसायटीचे चेअरमन संजय गरुड यांचे पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.

    कार्यक्रमानिमित्त नगराध्यक्षांच्या परिवाराकडून शिवप्रेमींकरिता शिवभोजनाचे आयोजन करण्यात आले. सोहळ्याच्या शेवटी नगरसेवक शांताराम गुजर यांनी उपस्थितांचे आभार मानले.या लोकार्पणाने शेंदुर्णी शहरात इतिहास साकार केला असून, शिवस्नेहींमध्ये अभूतपूर्व उत्साह निर्माण झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pahur : भराडी शाळेत बालआनंद मेळावा, विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेत चमक दाखवली

    March 14, 2026

    चिंचखेडे बु शाळेत सांस्कृतिक रंगत; इतिहास आणि देशभक्तीने भारलेले गुणदर्शन कार्यक्रम

    March 13, 2026

    Bhusawal:भुसावळ-जामनेर महामार्गावर ट्रकला अचानक आग लागली

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.