Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास
    क्राईम

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    saimatBy saimatFebruary 26, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Rs 50,000 cash stolen after breaking into a locked house; Series of house burglaries continue in Jalgaon
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    माधवनगर परिसरातील घटना; निवृत्त कर्मचाऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांची धाड

    साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :

    शहरातील गजबजलेल्या माधवनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी भरवस्तीतच धाडसी घरफोडी करत तब्बल २ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. हॉटेल राणी पार्क समोरील भागात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

    पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माधवनगर येथे भारत सुलतान संसारे (वय ५९) हे सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या कुटुंबासह राहतात. १५ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत त्यांचे संपूर्ण कुटुंब बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे मुख्य कुलूप तोडून आत प्रवेश केला.

    घरातील कपाट फोडून चोरट्यांनी २ लाख रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे ५२ हजार ५०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी (२५ फेब्रुवारी) सकाळी सुमारे ९.३० वाजता हा प्रकार उघडकीस आला. घरी परतल्यानंतर कुलूप तुटलेले आणि घरातील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत पाहून संसारे कुटुंबीयांना धक्का बसला.

    घटनेची माहिती मिळताच भारत संसारे यांनी तात्काळ चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप रोकडे करीत आहेत.

    भरवस्तीत घडलेल्या या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासनाने रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    शिवापूर शिवारात बिबट्याला सुरक्षित वाचवण्यात वनविभागाला यश

    April 16, 2026

    Kakinada Express : सिग्नल बिघाडाचा गैरफायदा घेत काकीनाडा एक्सप्रेसमध्ये दरोडा

    April 16, 2026

    मोठी कारवाई! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, युपीची अट्टल ATM चोर टोळी जेरबंद

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.