Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»एरंडोल»Erandole : एरंडोल जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला
    एरंडोल

    Erandole : एरंडोल जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला

    saimatBy saimatFebruary 4, 2026Updated:February 4, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अर्धवट जळालेला मृतदेह पाहून परिसरात दहशत

    साईमत/एरंडोल/प्रतिनिधी 

    एरंडोल तालुक्यातील पद्मालय गणेश देवस्थानाजवळील जंगलात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात दिसून आले आहे की, या घटनेमागे नियोजनबद्ध खून असून, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जंगलात फेकण्यात आला आहे.

    घटनास्थळी माहिती मिळाल्याप्रमाणे, पद्मालय ते नागदुली रस्त्यावर असलेल्या जंगलात काही गुराखी त्यांची गुरे चारवायला गेले होते. यावेळी त्यांनी जंगलात एका महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेहाच्या केवळ पायांचे अवशेष स्पष्टपणे दिसत होते, तर उरलेले अवयव अर्धवट जळालेल्या अवस्थेत होते. या घटनेची त्वरित माहिती स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना दिली आणि एरंडोल पोलीस स्टेशनला कळवण्यात आली.

    घटनास्थळी त्वरित पोलीस पथक दाखल झाले. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, एरंडोल पोलीस स्टेशनचे निरीक्षक निलेश गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी घटनास्थळ पाहणी केली. या ठिकाणी श्वानपथक, ठसे पथक आणि मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन पथक दाखल झाले, तसेच आवश्यक नमुने ताब्यात घेतले गेले आहेत.

    प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, महिलेच्या मृत्यूसाठी ज्वलनशील पदार्थाचा वापर करून तिला जाळण्यात आले आहे. संध्याकाळी ५ वाजता मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

    सदर घटनेत अद्याप मृत महिलेची ओळख पटलेली नाही. पोलीस अधिकारी सांगतात की, ओळख पटविणे हा प्रमुख आव्हानात्मक टप्पा आहे. प्रथमदर्शनी तपासात असे दिसून आले आहे की, ही घटना नियोजनबद्ध खून असून, पुरावा नष्ट करण्यासाठी केलेली आहे.

    घटनास्थळ आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांची विविध पथके तपासासाठी रवाना करण्यात आली आहेत. पोलीस तपास सुरू असून, अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Savda : सावदात भीषण आग! पाच दुकाने जळून खाक, लाखोंचे आर्थिक नुकसान

    February 4, 2026

    Raver : रावेरजवळ समोरासमोर धडक; दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

    February 4, 2026

    Pachora : पाचोर्‍यात खळबळजनक आणि संतापजनक घटना

    February 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.