Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष
    क्राईम

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    saimatBy saimatFebruary 1, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Muktainagar: Villagers angered by police negligence in the theft case at Prasadeshwar Shiva temple
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चिंचोल मेहून येथील प्राचीन मंदिरात चोरटे रंगेहात पकडले, तरीही गुन्हा नोंद न होण्याने संताप

    साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी 

    मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल मेहून येथील प्राचीन प्रसादेश्वर शिवमंदिरात चोरीचा गंभीर प्रयत्न उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी चोरटे पकडले तरीही पोलीस प्रशासनाने अद्याप गुन्हा नोंदवले नसल्याचे समोर आले असून, या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

    मंदिरातील चोरीचे प्रकार यापूर्वीही वारंवार घडत आले आहेत. गेल्या एका वर्षाच्या आत दोन वेळा तांब्याचे नाग आणि पितळी घंटे चोरीस गेले होते, मात्र पोलिसांकडून मंदिराच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे परिसर कायमच असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे.

    आजच्या घटनेत चोरटे मोठ्या प्रमाणावर चोरी करण्याच्या तयारीत असताना गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांना रंगेहात पकडण्यात आले. पकडलेल्या संशयितांना ताबडतोब पोलीसांकडे सुपूर्द करण्यात आले, तरीही गुन्हा नोंद न होणे ही बाब नागरिकांना संशयास्पद वाटत आहे.

    पोलीस प्रशासनाचे स्पष्टीकरणही ग्रामस्थांच्या संतापात भर घालणारे ठरले आहे. पोलिसांनी पकडलेल्या व्यक्तींबाबत दावा केला की ते नदीमध्ये काम करणारे मजूर असून केवळ दर्शनासाठी आले होते. मात्र, ग्रामस्थांनी हा दावा फेटाळून लावत परिसरात नदी नसल्याचे स्पष्ट केले, ज्यामुळे पोलिसांची भूमिका गंभीर प्रश्नाखाली आली आहे.

    घटनेनंतर गावकऱ्यांनी तात्काळ चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला असून, न झाल्यास मुक्ताईनगर पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन करण्याची तयारी व्यक्त केली आहे. श्रद्धास्थानांच्या सुरक्षेबाबत पोलिसांची उदासीन भूमिका असह्य असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे आणि प्रशासनाने प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे.

    या घटनेमुळे मुक्ताईनगर तालुक्यासह परिसरात पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काही तासांत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    Jalgaon : ट्रॅक्टर पलटीने बाजार समिती परिसर गोंधळात जीवितहानी टळली

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.