Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा
    क्राईम

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    saimatBy saimatFebruary 1, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Yaval: Thieves steal mangalsutras of five women, taking advantage of crowd during Atraval Yatra
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे व पोत लांबविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे

    साईमत/यावल /प्रतिनिधी

    यावल तालुक्यातील अट्रावल परिसरात भरलेल्या प्रसिद्ध मुंजोबा यात्रेत भाविकांची मोठी गर्दी उसळली असताना, याच गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने पाच महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे व पोत लांबविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवार, दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ ते ४ वाजेदरम्यान घडली असून, याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    यात्रेसाठी आलेल्या मंदाकिनी मुकेश गजरे या फिर्यादी असून, त्या आपल्या सहकारी राखी सुरवाडे, रुपाली कोळी, रोहिणी जाधव व स्वाती वराडे यांच्यासह मुंजोबा यात्रेत सहभागी झाल्या होत्या. देवदर्शन व बाजारपेठ परिसरात प्रचंड गर्दी असल्याचा फायदा घेत अज्ञात आरोपीने अत्यंत शिताफीने या पाचही महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे काढून पळ काढला. चोरी झाल्याचे लक्षात येताच महिलांमध्ये एकच खळबळ उडाली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे ५६ हजार रुपये आहे. घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे.

    या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नरेंद्र बागुले करीत आहेत. दरम्यान, यात्रेच्या व जत्रांच्या काळात नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी विशेष सतर्कता बाळगावी, दागिने उघड्या स्वरूपात न घालण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    February 1, 2026

    Chop : चोपड्यातील वाहतूक हवालदार निलंबित

    January 31, 2026

    Jalgaon : ट्रॅक्टर पलटीने बाजार समिती परिसर गोंधळात जीवितहानी टळली

    January 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.