महिलेला हात धरून मोटारसायकलीवर बसवण्याचा प्रयत्न
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी –:
पाचोरा शहरातील पुजारी नगर परिसरात बुधवारी दुपारी २ ते २:३० वाजेच्या सुमारास एका २० वर्षीय विवाहितेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली. कामाच्या निमित्ताने शहरात आलेली पीडित महिला एका रिकाम्या प्लॉटजवळून जात असताना, आरोपी निलेश कुमावत दुचाकीवर येऊन तिचा उजवा हात धरून बळजबरीने मोटारसायकलीवर बसवण्याचा प्रयत्न केला.
महिलेवर लज्जास्पद कृत्य केल्याने तिने जोरात आरडाओरड केली, त्यावर आरोपी तिथून पसार झाला. घाबरलेली महिला ताबडतोब पाचोरा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.
या प्रकरणाचा तपास पोलीस पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू ठेवला असून, आरोपीच्या शोधासाठी शहरभर पथक तैनात करण्यात आले आहे.पोलीसांनी नागरिकांना जागरूक राहण्याची आणि अशा प्रकारच्या घटनांची त्वरित माहिती देण्याची सूचना केली आहे.
