महेंद्र नगर परिसरातील नवयुवकांनी ग्रामपंचायतीकडे अर्जाव्दारे केली आहे.
साईमत/पहूर,ता. जामनेर /प्रतिनिधी :
पहूर कसबे येथील प्रभाग क्रमांक ६, महेंद्र नगर परिसरात तरुण व नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी ओपन स्पेस उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी येथील नवयुवकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या पोलीस भरती,
आर्मी भरती तसेच शासकीय नोकरीसाठी शारीरिक चाचण्यांची तयारी करणाऱ्या युवकांना नियमित व्यायामासाठी योग्य जागेचा अभाव आहे. महेंद्र नगर परिसरातील मोकळी जागा व्यायामासाठी अत्यंत उपयुक्त असून, त्या ठिकाणी ओपन स्पेस विकसित केल्यास युवकांना मोठा लाभ होणार आहे.
व्यायामासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध झाल्यास युवकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल तसेच स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना सराव करणे सुलभ होईल, अशी मागणी महेंद्र नगर परिसरातील नवयुवकांनी ग्रामपंचायतीकडे अर्जाव्दारे केली आहे. निवेदनावर अनेक युवकांच्या स्वाक्षऱ्या आहे.
