Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पारोळा»Parola : पारोळा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ
    पारोळा

    Parola : पारोळा येथे शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ

    saimatBy saimatDecember 13, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Inauguration of cotton procurement center
    Oplus_131072
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शेतकऱ्यांना हमीभावाचा दिलासा, खासगी व्यापाऱ्यांची पिळवणूक थांबणार

    साईमत/पारोळा/प्रतिनिधी : 

    शहरात श्री बालाजी कोटेक्स जिनिंग ॲण्ड प्रेसिंग येथे भारतीय कापूस निगम लिमिटेडच्या वतीने शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या केंद्राचे उद्घाटन आ.चिमणराव पाटील व नगराध्यक्षा नलिनी चिमणराव पाटील यांच्याहस्ते झाले.

    शासकीय कापूस खरेदी केंद्रामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस थेट शासनाच्या आधारभूत हमी किमतीनुसार खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबवून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य दर मिळणार असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

    हा उपक्रम शेतकरी बांधवांच्या आर्थिक हितासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. उद्घाटनप्रसंगी तालुकाप्रमुख मधुकर पाटील, ग्रेडर इंद्रप्रकाश लहाटा, सिद्धार्थ सिंग, श्री बालाजी कोटेक्स जिनिंग ॲण्ड प्रेसिंगचे संचालक दयाराम पाटील, संजय पाटील, भगवान मोरे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    या केंद्राच्या माध्यमातून कापूस खरेदी प्रक्रिया पारदर्शक राहणार असून शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आगामी कापूस हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Parola : क्षणात धावून येत नगरसेवक पंकज मराठेंनी टाळला मोठा अनर्थ

    January 23, 2026

    Parola : वारसा हक्क डावलून आई-विरुद्ध सख्ख्या भावांनी मालमत्ता बळकावली

    January 21, 2026

    पारोळ्यात शिंदे गटाची संघटनात्मक पकड मजबूत; अमृत चौधरींवर जबाबदारी

    January 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.