एकल वादन, एकल लोकगीत, समूह लोकगीत प्रकारात उत्तेजनार्थ
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची संलग्न संस्था बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईद्वारा आयोजित जल्लोष लोककलेचा – २०२५ लोककला महोत्सवात समूह कातकरी लोकनृत्य प्रकारात विशेष नेपुण्यासह अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्वोत्कृष्ट ठरली. संघाला ज्येष्ठ रंगकर्मी विनोद ढगे यांच्याहस्ते विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच एकल वादन प्रकारात अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता नववीतील विद्यार्थी साहिल मोरे याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. एकल लोकगीत प्रकारात इयत्ता आठवीतील आराध्य खैरनार या विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. तसेच समूह लोकगीत प्रकारात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या यशाबद्दल स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.
समूह लोकनृत्यात २५ संघ सहभागी झाले होते. समूह लोकगीतात २० संघ होते. एकल वादनात ३५ विद्यार्थी तर एकल लोकगीतात २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, एकल वादन, एकल लोकगीत, एकल नृत्य अशा सर्व प्रकारांमध्ये सहभाग नोंदवला होता. प्रशिक्षक म्हणून प्राचार्य रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभूती स्कूलचे नृत्यशिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, संगीत शिक्षक भूषण खैरनार यांनी काम पाहिले.
