Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Nashirabad Toll Plaza : नशिराबाद टोल नाक्याजवळ अमळनेर आगाराच्या बसचा अपघात
    जळगाव

    Nashirabad Toll Plaza : नशिराबाद टोल नाक्याजवळ अमळनेर आगाराच्या बसचा अपघात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 28, 2025Updated:October 28, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महिला प्रवासी चाकाखाली चिरडून जागीच ठार

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

    शहराजवळील नशिराबाद टोल नाक्याजवळ मंगळवारी, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास झालेल्या बसच्या भीषण अपघातात महिला प्रवासी चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली आहे. ही घटना पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेमुळे नशिराबाद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    प्राप्त माहितीनुसार, अमळनेर आगाराची बस जळगावकडून भुसावळकडे जात होती. तेव्हा अचानक बसच्या समोरील चाकांपैकी एक टायर फुटला. त्यामुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून बस भरकटली आणि थेट टोल नाक्याजवळील भिंतीवर आदळली. धक्क्याने खिडकीत बसलेली एक महिला प्रवासी बाहेर फेकली गेली आणि ती बसच्या मागील चाकाखाली आली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत महिलेचे साराबाई गणेश भोई (वय ४६, रा. पाडळसा ता. यावल) असे नाव आहे.

    पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात हलवला

    अपघातानंतर स्थानिक नागरिकांसह टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात हलवला.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव महापालिकेत स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापती निवडीची अंतिम तयारी

    February 25, 2026

    Jalgaon : महापौरांचा आवाहन स्थानिक महिला बचत गटांना खरेदीद्वारे पाठबळ द्या!

    February 25, 2026

    Jalgaon: जळगाव जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर; ५० कोटी ९७ लाखांचा विकासाचा दृष्टिकोन

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.