Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»एरंडोल»SIT Is Formed To Investigate : …अखेर ग्रामस्थांच्या मोर्चानंतर खुनाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना
    एरंडोल

    SIT Is Formed To Investigate : …अखेर ग्रामस्थांच्या मोर्चानंतर खुनाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 28, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रिंगणगाव खून प्रकरणी जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत कलम वाढविले

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय तेजस गजानन महाजन याचा गेल्या १६ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हत्या करण्यात आली. ही हत्या नसून नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करत ग्रामस्थांनी तेजसच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी, या मागणीसाठी २७ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चानंतर खुनाच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन केले आहे. दरम्यान, या प्रकरणात आता ग्रामस्थांनी नरबळीची शक्यता वर्तवल्याने जादूटोणाविरोधी कायदे अंतर्गत कलम वाढविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. डॉ. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा छडा लावला जाणार आहे.

    एरंडोल तालुक्यातील रिंगणगावचे गजानन नामदेव महाजन (वय ४५) यांचा मुलगा तेजस हा १६ जून रोजी बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह काही दिवसात सापडला होता. त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली होती. पुढे तपासात नरबळीच्या कलमांचा समावेशही केला आहे. मात्र, त्यानंतरही ग्रामस्थांनी तपासाबाबत असंतोष व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा. तपास करतांना नरबळीचे कलम समाविष्ट करून कार्यवाही करावी. शेतातील सीसीटीव्हीत दिसणाऱ्या एरंडोल संशयित आरोपी करावे. ॲड.उज्ज्वल निकम यांची सरकारी अभियोक्ता म्हणून नेमणूक करावी. प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. त्यातील तीन मागण्या आधीच मान्य झाल्या आहेत. दोन मागण्या प्रलंबित आहे. यासाठी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासन शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

    विशेष पथकाकडून तपास अधिक गतीने अन्‌ प्रभावीपणे करणार

    पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष तपास पथकाची नेमणूक केली आहे. पथकात काही अधिकाऱ्यांचा समावेश केला आहे. पथकात अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव (पर्यवेक्षण अधिकारी) कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर, पोलीस उपनिरीक्षक विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पाटील, जितेंद्र वल्टे, निलेश गायकवाड, राहुल कोळी, सचिन पाटील यांचा समावेश आहे. विशेष पथकाकडून तपास अधिक गतीने आणि प्रभावीपणे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.