विद्यार्थ्यांना व्यसनांपासून होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देणे गरजेचे
साईमत/नवापूर/प्रतिनिधी :
येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ व महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत अमली पदार्थ व अवैध तस्करी गैरप्रकार जागरूकता कार्यक्रम आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश भाविका परमार होत्या. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश धनंजय देवरे, नवापूर तालुका वकील संघाचे अध्यक्ष रामू वळवी, सचिव प्रदीपकुमार गावित, मुख्याध्यापिका कमल कोकणी, उपमुख्याध्यापक ए.एन.सोनवणे, पर्यवेक्षक हरीष पाटील, पर्यवेक्षक जी.डी.सूर्यवंशी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी भाविका परमार, धनंजय देवरे, रामू वळवी यांनी मनोगत व्यक्त केले. समाजात व्यसनांमुळे घडत असलेल्या वास्तविक घटनांवर प्रकाश टाकून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून होणाऱ्या दुष्परिणामांची वारंवार माहिती देणे गरजेचे आहे. आपली मानसिकता चांगली राहिली तर आपण व्यसनापासून दूर राहू, असे मान्यवरांनी मनोगतात सांगितले.
कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या नूतन अभ्यासिकासह ग्रंथालयाची पाहणी केली. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन अर्चना बिरारी तर आभार हेमंत पाटील यांनी मानले.