भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
साईमत/शिरपूर/प्रतिनिधी :
येथील नगरपालिकेलगतच्या उद्यानात भाजपातर्फे बलिदान दिनानिमित्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या तैलचित्राला उपस्थित सर्वांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या कार्याबद्दल भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी माहिती देऊन जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.
यावेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर भाजपा माजी तालुकाध्यक्ष किशोर माळी, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, ग्रामीण मंडळ अध्यक्ष भरत पाटील, सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल, जिल्हा चिटणीस हेमंत पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, अल्पसंख्यक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुबीन शेख, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र भोई, ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डाॅ. अतुल बडगुजर, भाजपा शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, जैन प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष गणेश जैन, माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप राजपूत, पं. स.चे माजी सदस्य चंद्रकांत पाटील, अनु. जाती मोर्चाचे मा. जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, शहराध्यक्ष विक्की चौधरी, उद्योग आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र राजपूत, व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, भाजपाचे शहर उपाध्यक्ष नरेश पवार, अविनाश शिंपी, शहर चिटणीस राधेश्याम भोई, भटके विमुक्त आघाडीचे शहराध्यक्ष राजेश्वर शिवदे, हिंगोणीचे सरपंच सोमा भील, राज शिसोदिया, संजय पाटील, रफीक तेली, युसुफ बेग, अजिंक्य शिरसाठ, अनिल पाटील, पंडीत पाटील, संदीप कुवर, विजय राजपूत, पिंटु पाटील, बाबा गोसावी, मोनु पाटील, संजय न्हावी, आप्पा पाटील, बापु ठाकरे, सारीष पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.