Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Navapur House Burglary Case : नवापुरला घरफोडी प्रकरणी संशयित अल्पवयीन मुलास २४ तासात अटक
    क्राईम

    Navapur House Burglary Case : नवापुरला घरफोडी प्रकरणी संशयित अल्पवयीन मुलास २४ तासात अटक

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 25, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    घरफोडी केल्याची दिली कबुली, नवापूर पोलिसांची कामगिरी

    साईमत/नवापूर/प्रतिनिधी :

    शहरातील घरफोडीच्या घटनेतील संशयित मुलास पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे. तसेच चोरीला गेलेला दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई नवापूर पोलिसांनी केली.

    शास्त्रीनगर भागात राहणाऱ्या जयेश शंकर वसावे यांच्या घराच्या मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले दागिने, मोबाईल, घड्याळ असा १ लाख ५२ हजार ६५० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. जयेश वसावे यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक अभिषेक दिलीप पाटील यांनी तपासासाठी पथक तयार करून परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यात एका मुलाच्या संशयित हालचाली आढळून आल्याचे स्पष्ट झाले. त्याची ओळख पटवून त्याच भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या घरी पथक गेले. तो घरीच आढळल्याने चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. शिवाय चोरलेला १ लाख ५२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन त्याला ताब्यात घेण्यात आले. तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे करीत आहेत.

    यांनी केली कारवाई

    ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे, हवालदार अमोल जाधव, दिनेशकुमार वसुले, दिनकर चव्हाण, दिनेश बाविस्कर, संजय गावित, भारती आगळे यांच्या पथकाने केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.