Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Truck Driver Killed On The Spot : महामार्गावरील दोन ट्रकच्या धडकेत ट्रक चालक जागीच ठार
    जळगाव

    Truck Driver Killed On The Spot : महामार्गावरील दोन ट्रकच्या धडकेत ट्रक चालक जागीच ठार

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 24, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दुसरा चालक गंभीर जखमी, उपचारासाठी दाखल केले रुग्णालयात

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ दोन ट्रकच्या धडकेत एक ट्रक चालक जागीच ठार तर दुसरा चालक गंभीर जखमी झाला झाल्याची घटना मंगळवारी, २४ जून रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार एका ट्रकने रस्ता ओलांडताना वेगावर नियंत्रण गमावल्यामुळे ही धडक झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

    शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ ओडिशा पासिंगचा ट्रक (क्र.ओडी-१५-सी-२९६३) आणि राजस्थान पासिंगचा ट्रक (क्र.आरजे-१४-जीटी-०४२१) यांच्यात समोरासमोर जबरदस्त धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की, एक ट्रक चालक केबिनमध्ये अडकून गेला होता. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन अडकलेल्या चालकाला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. केबिन दोरीच्या सहाय्याने ओढून त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला आहे. तसेच त्याच्या डोळ्याला मोठी इजा झाली आहे. त्यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

    ठप्प झालेली वाहतूक पोलिसांनी केली सुरळीत

    अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एमआयडीसीचे पोलीस आणि वाहतूक विभागाचे अधिकारी दाखल झाले होते. त्यांनी अपघातस्थळी पंचनामा करून ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, पोलीस अधिक तपास करीत आहे. ट्रकचालक कोणत्या दिशेने, कोणत्या वेगात जात होते, त्याचा तपास करण्याचे काम सुरु आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.