Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»धुळे»Chhatrapati Shivaji Library In Sakri : साक्रीतील छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या अध्यक्षपदी साहेबराव सोनवणे
    धुळे

    Chhatrapati Shivaji Library In Sakri : साक्रीतील छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या अध्यक्षपदी साहेबराव सोनवणे

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 21, 2025Updated:June 21, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    उपाध्यक्षपदी सुरेश सोनवणे यांची निवड, अनेकांनी केला निवडीबद्दल सत्कार

    साईमत/साक्री/प्रतिनिधी :

    येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयाची २०२५-३० ची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात वाचनालयाच्या अध्यक्षपदी साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांची पदसिद्ध अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक सुरेश सोनवणे यांची निवड करण्यात आली.

    ही निवड प्रक्रिया निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार राजेंद्र सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी साक्रीचे तहसीलदार तथा पदसिद्ध अध्यक्ष म्हणून श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून साहेबराव सोनवणे यांचा ज्येष्ठ संचालक सुरेश सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तहसिलदारांनी वाचनालयातर्फे वर्षभरात विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.

    यावेळी नूतन कार्यकारिणीची निवडही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. त्यात वाचनालयाचे उपाध्यक्ष म्हणून सुरेश सोनवणे, कार्यवाहपदी प्रा. व्ही.के. शाह, सहकार्यवाह म्हणून ॲड. नरेंद्र मराठे यांचा निवडीत समावेश आहे. निवडीनंतर तहसीलदार साहेबराव सोनवणे, सुरेश सोनवणे, प्रा. व्ही. के. शाह, ॲड. नरेंद्र मराठे यांनी मनोगत व्यक्त केले.

    निवडणुकीच्या विजयात एकाच गावाच्या दोन संचालकाचा समावेश

    यावेळी वाचनालयाचे संचालक अजीजखा पठाण, प्रा. डी.एन. खैरनार, प्राचार्य नरेंद्र तोरवणे, प्राचार्य डॉ. लहू पवार, विजय भोसले, आर.पी. भामरे, ग्रंथपाल उज्ज्वल अग्निहोत्री उपस्थित होते. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत एकाच गावाचे असणारे ॲड. नरेंद्र मराठे, प्राचार्य लहू पवार असे दोन संचालक निवडून आले आहेत. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. लहू पवार तर आभार प्राचार्य नरेंद्र तोरवणे यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Dhule : धुळ्यातील पिंपळनेर हादरले; आनंदोत्सवात धारदार शस्त्रांचा कहर

    February 20, 2026

    Taloda:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तळोदा महाविद्यालयात अभिवादन

    January 3, 2026

    Navapur:“नवापूर नगराध्यक्षांचे दालन नागरिकांसाठी सदैव खुले; नवापूरमध्ये लोकशाही संवादाला नवे बळ”

    January 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.