Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Hit And Run Incident : महाबळ ते वाघनगर रस्त्यावर घडला ‘हिट अँड रन’ : महिलेचा उपचारावेळी मृत्यू
    क्राईम

    Hit And Run Incident : महाबळ ते वाघनगर रस्त्यावर घडला ‘हिट अँड रन’ : महिलेचा उपचारावेळी मृत्यू

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 20, 2025Updated:June 20, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चालक पोलिसांच्या ताब्यात, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघात कैद

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरात गुरुवारी, १९ जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका मद्यधुंद चारचाकी चालकाने केलेल्या भीषण ‘हिट अँड रन’ अपघातात ४५ वर्षीय वंदना सुनील गुजराथी यांचा शुक्रवारी उपचारावेळी मृत्यू झाला आहे. अपघातात अन्य दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना शहरातील महाबळ ते वाघनगर रस्त्यावर घडली. दरम्यान, हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

    शहरातील वाघ नगरातील मोंटू शिवपाल सैनी हा कार (क्र. एमएच १९, ईपी १६९४) घेवून भरधाव वेगाने जात होता. महाबळ परिसरातील खासगी क्लासेसजवळ त्याने अनेक वाहनांना धडक दिली. त्यात वाहन चालक गंभीर जखमी झाले. तसेच महाबळ परिसरातील रहिवासी वंदना सुनील गुजराथी १९ जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जात होत्या. त्याचवेळी शहराकडून वाघनगरकडे भरधाव वेगात येणाऱ्या कार चालक मोंटूने त्यांना ओव्हरटेक करताना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, वंदना गुजराथी १५ ते २० फूट दूर फेकल्या गेल्या. एवढ्यावरच न थांबता, मद्यधुंद अवस्थेतील वाहन चालकाने त्याच वेगात पुढे जात आणखी दोघांना धडक दिली. त्याने वाघनगर परिसरातील काही घरांच्या बाहेरील कुंड्या आणि बाकही तोडले.

    सर्व प्रकारानंतर अखेर एका ठिकाणी चिखलात वाहन फसल्याने आरोपी चालकाने तिथून पळ काढून घर गाठले. घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर आणि तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रामानंद नगर पोलिसांनी तपास करून मद्यधुंद वाहन चालक मोंटू सैनी याला ताब्यात घेतले आहे. जखमी वंदना गुजराथी यांना काही नागरिकांनी तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, शुक्रवारी २० जून रोजी सकाळी ७ वाजेपूर्वी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

    पब्लिक मारनंतर केले पोलिसांच्या स्वाधीन

    अनेकांना धडक देणाऱ्या वाहनचालकाचा परिसरातील नागरिकांनी पाठलाग केला. सैनी हा दर्गा परिसरात वाहन सोडून पसार झाला होता. पाठलाग करणाऱ्यांनी त्याला कोल्हे हिल्स परिसरात पकडले. त्यानंतर त्याला पब्लिक मार दिल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. रामानंद नगर पोलिसांनी सैनीला ताब्यात घेत त्याचे वाहनही जप्त करुन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    गतिरोधकअभावी घडताहेत अपघात

    महाबळ ते वाघनगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उतार असल्याने याठिकाणी नेहमीच अपघात होतात. भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांवर लगाम घालण्यासाठी याठिकाणी तात्काळ स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसविण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.