Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Retired Senior Art Teacher Rajendra Javale : चित्रकलेतही मुलांना करता येईल ‘करिअर’ : सेवानिवृत्त ज्येष्ठ कलाशिक्षक राजेंद्र जावळे
    जळगाव

    Retired Senior Art Teacher Rajendra Javale : चित्रकलेतही मुलांना करता येईल ‘करिअर’ : सेवानिवृत्त ज्येष्ठ कलाशिक्षक राजेंद्र जावळे

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 16, 2025Updated:June 16, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पिंप्राळा परिसरात एलेमेंटरी परीक्षेचा वार्षिक गुणगौरव सोहळा

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    मुले सकारात्मक पध्दतीने घडतात. त्यांना त्यांच्या आवडीनुसार काम करू द्या. अनेकवेळा पालकांकडून मुलांच्या कला दाबल्या जातात. पालक त्यांच्यावर दडपण टाकतात. अशातच चित्रकला हा पण अभ्यासाचा एक भाग आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना रागवू नये. मुलांना चित्रकलेतही ‘करिअर’ करता येणार असल्याचे भुसावळ येथील सेंट्रल रेल्वे सिनियर सेकंडरी इ.एम.स्कुलचे सेवानिवृत्त ज्येष्ठ कलाशिक्षक राजेंद्र जावळे यांनी सांगितले. शहरातील पिंप्राळा परिसरातील कलादर्शन ड्राॅईंग क्लासेसतर्फे एलेमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षेचा वार्षिक गुणगौरव सोहळा नुकताच पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद सोनवणे, गिरीष डेरे, जितेंद्र चौधरी, नृत्यकला दिग्दर्शक नरेश बागडे आदी उपस्थित होते. गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह (ट्राॅफी) देण्यात आले.

    भुसावळ येथील कलाक्षेत्रातील आवड असणारी राशी पाटील ही विद्यार्थिनी दिव्यांग आहे. तिने तोंडात ब्रश धरून पोट्रेट आणि जिभेच्या साहाय्याने पियानोवर एक गीत सर्वांसमोर प्रत्यक्षदर्शी दाखवले. हे सर्व लाईव्ह बघितल्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुणे, पालक व विद्यार्थ्यांनी तिचे स्वागत केले. तिच्या कलेबद्दल असलेली आस्था, जिद्द, चिकाटी पाहुन प्रभावित झाल्याचे पु.ना. गाडगीळ ॲण्ड सन्सचे व्यवस्थापकांनी सांगितले. यशस्वीतेसाठी अभिराज चव्हाण, दक्ष पाटील, भाग्यश्री चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, चैतन्य पाटील, ओंकार जोशी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक विजय चव्हाण तर सुत्रसंचालन जान्हवी जोशी, मनिषा कुळकर्णी यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.