Iron Pipe In Grain Market दाणा बाजारात तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

0
12

जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

शहरातील दाणाबाजारात पार्सल देण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. मारहाणीत एका तरुणाला लोखंडी पाईपनेही मारहाण केली होती. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील सुप्रिम कॉलनी येथील रहिवासी मुस्तकीम शेख अलीम शेख (वय २०) हा भाटीया मार्केटमधील एका हार्डवेअरच्या दुकानात काम करतो. त्याचे दुकान मालक पवन दांडगे यांनी त्याला दाणाबाजारातील हिरा धनगर यांच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये एक पार्सल देण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार, मुस्तकीम हा त्याचा सहकारी प्रफुल्ल कोळी (रा. मोहाडी) याला सोबत घेऊन ट्रान्सपोर्ट ऑफिसला गेला होता. यावेळी ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कुणाल कांबळे आणि त्याच्या एका साथीदाराने मुस्तकीम आणि प्रफुल्ल यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत त्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली.

मारहाणीवेळी कुणालने मुस्तकीमला लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले. मारहाणीत जखमी झालेल्या मुस्तकीमने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तात्काळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून कुणाल कांबळे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here