Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Shirpur Police Performance : शिरपूर पोलिसांची कामगिरी : चोरीची दुचाकी २४ तासात हस्तगत, सराईत गुन्हेगार ताब्यात
    क्राईम

    Shirpur Police Performance : शिरपूर पोलिसांची कामगिरी : चोरीची दुचाकी २४ तासात हस्तगत, सराईत गुन्हेगार ताब्यात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 14, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शिरपूर पोलिसांच्या तत्परतेचे होतेय कौतुक

    साईमत/शिरपूर/प्रतिनिधी :

    चोरीला गेलेली होंडा सी.बी. शाईन मोटार सायकल शिरपूर पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या २४ तासांच्या आत सराईत गुन्हेगाराला शिताफीने ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल हस्तगत करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शिरपूर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल शिरपूर ठाणे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    मनोहर दत्तात्रय कोळी (वय ३०, रा.अर्थ खुर्द, ता. शिरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ७ जून रोजी दुपारी ३.३० ते ४.४५ वाजेच्या सुमारास त्यांची ५० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा सी.बी. शाईन (क्र.एम. एच. १८, बी.बी.५५२६) मोटारसायकल शिरपूर शहरातील गुजराथी कॉम्प्लेक्स समोरून चोरीला गेली होती. अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून दुचाकी चोरून नेल्याची त्यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल केला होता. बकरी ईद सणानिमित्त शोध पथकाचे अंमलदार शिरपूर शहरात पेट्रोलिंग करत असताना, रिक्रिएशन गार्डनसमोर रोडवर एका अनोळखीच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. त्याच्या ताब्यात असलेल्या काळ्या रंगाच्या, विना क्रमांकाच्या होंडा सी.बी. शाईन मोटारसायकलवर तो संशयितरित्या फिरत होता. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केल्यावर त्याने आपले नाव अर्शद शेख हनीफ शेख (वय २४, रा. लाला सरदार नगर, देवपूर, धुळे) असे सांगितले. मोटारसायकलबाबत विचारपूस केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

    सराईत गुन्हेगारावर दाखल आहेत ६ गुन्हे

    पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्याची कसून चौकशी केल्यावर मोटारसायकलचा चेसिस नंबर व इंजिन नंबरची खात्री केल्यावर ती मोटार सायकल शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातीलच असल्याची खात्री झाली. अर्शद शेख हनीफ शेख याने गुजराथी कॉम्प्लेक्स येथून ही मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी त्याच्यावर धुळे देवपूर पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचे २, चोरीचा १, घरफोडीचे २ आणि मारामारीचा १ असे ६ गुन्हे दाखल आहेत.

    यांनी केली कारवाई

    ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, डी.बी. पथकाचे पो.हे.कॉ. राजेंद्र रोकडे, रवींद्र आखडमल, पो.कॉ. विनोद आखडमल, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, भटू साळुंके, प्रशांत पवार, मनोज महाजन, मनोज दाभाडे, सचिन वाघ, आरीफ तडवी, समाचारे, उमेश पवार, होमगार्ड मियाननवार, राम भील, सुनील पावरा आदींनी केली आहे. तपास पो.हे.कॉ. राजेंद्र रोकडे करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.