Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नंदूरबार »N.P. Elections Began To Sound : प्रभाग रचनेच्या कामाचे आदेश येताच न.पा. निवडणुकीचे पडघम वाजू लागले
    नंदूरबार 

    N.P. Elections Began To Sound : प्रभाग रचनेच्या कामाचे आदेश येताच न.पा. निवडणुकीचे पडघम वाजू लागले

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 13, 2025Updated:June 13, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवापूर नगरपालिका ‘अलर्ट मोडवर’, स्थानिक स्तरावर पक्षविरहित आघाड्या होणार किंवा कसे..?

    साईमत/नवापूर/प्रतिनिधी :

    येथील नगर पालिका निवडणूक आता तोंडावर आली आहे. प्रभाग रचना करण्याचे राज्य सरकारने आदेश दिल्याने नवापूर नगरपालिका विषय पुन्हा चर्चेला आला आहे. प्रशासकीय स्तरावर यंत्रणा जागी झाली असून कामाला लागली आहे. आता प्रभाग रचना कशी होते, याकडे नवापूरकरांचे लक्ष लागून राहणार आहे. लगीनघाई आता वेग घेणार आहे. भावी नगरसेवक आता गतीने कामाला लागणार आहे. प्रत्येक प्रभागात वेगवेगळी नावे चर्चेत असून इच्छुक उमेदवारांची जत्रा कुठपर्यंत टिकते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

    गेल्या काही महिन्यापासून प्रत्येक इच्छुक उमेदवार आपापल्या परीने प्रभागाची सेवा करतांना दिसत आहे तर प्रभागात होणाऱ्या कार्यक्रमात गैरहजर असणारा प्रत्येक कार्यक्रमात आवर्जुन हजेरी लावताना दिसत आहे. प्रभागात राजकीय पक्षांसह अपक्ष, माजी नगरसेवक, शिक्षक, पत्रकार, विविध संस्थाचे पदाधिकारी, साहित्यिक, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच महिला वर्गही जोमाने कामाला लागले आहेत. प्रत्येक भावी नगरसेवक आपले काम अत्यंत गोपनीय पद्धतीने करत आहे. प्रत्येकाला विश्वास आहे की, ‘प्रभागाचा नगरसेवक यंदा मीच’ अशी भाषा बोलली जात आहे. तसेच प्रभागातील मतदारांना वेळोवेळी मदतीसाठी आज तरी सर्व तत्पर आहे. म्हणून ‘कल किसने देखा’ म्हणत मतदार आपल्या समस्यांचे निराकरण भावी नगरसेवकांकडून करून घेतांना दिसत आहे.

    योग्य उमेदवाराला व स्थानिक व्यक्तीला संधी द्यायची अशीही चर्चा सध्या सुरू आहे. काही प्रभागात कामे झाली नसल्याने लोकांची ओरड आहे. त्यामुळे पुन्हा तोच नगरसेवक ‘रिपीट’ करायचा नाही, असेही चर्चिले जात आहे. नगरपालिका प्रभाग रचनेसंदर्भात राज्य शासनाने सर्व नगरपालिकांना आदेश काढल्याने नगरपालिका निवडणुकीसंदर्भात नवापूर शहरात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. नवापूर नगरपालिकेची डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपलेली आहे. सध्या नगरपालिकेवर प्रशासक राज सुरू आहे.

    प्रभाग रचनेच्या कामाचे आदेश येताच कारवाई सुरू

    नवापूर नगरपालिकेची लोकसंख्या आणि मतदार संख्या लाखाच्या आत आहे. गेल्या निवडणुकीत १० प्रभाग आणि २० सदस्य संख्या होती. यावेळी तीच स्थिती राहण्याची दाट शक्यता आहे. सध्या तरी नगरपालिका निवडणुकीत निवडणुकीचे पडघम हळुवार वाजायला सुरुवात झाली आहे.प्रभाग रचनेच्या कामाचे आदेश येताच कारवाई सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नगर पालिका प्रशासन ‘अलर्ट मोडवर’ आले आहे.

    काँग्रेस विरुद्ध इतर पक्ष अशी स्थिती

    नवापूर नगरपालिकेत काँग्रेस विरुद्ध इतर पक्ष अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचा विचार करता नवापुरात काँग्रेसच्या माध्यमातून आघाडी भक्कम आहे. आता नवापूर नगर पालिकेत पक्षीय स्तरावर स्वबळावर की आघाडीवर हे चित्र नंतर स्पष्ट होणार आहे. नवापूर नगरपालिकेच्या स्थानिक स्तरावर पक्ष विरहित आघाड्या होणार किंवा कसे यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    ‘जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…’ अजितदादांच्या शोकसभेत सर्वपक्षीय नेत्यांचे अश्रू अनावर; वरळी डोममध्ये भावनांचा पूर

    February 23, 2026

    Deputy Chief Minister : सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत

    January 31, 2026

    अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी; सुरक्षा रक्षक रडताना जय पवारांनी केलं सांत्वन

    January 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.