हवामान विभागाने वर्तविला अंदाज
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कमी असला तरी आर्द्रतायुक्त आणि ढगाळ वातावरणामुळे उन्हाची दाहकता जास्तच जाणवत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरीमुळे बहुतांश ठिकाणी शेतमशागतीच्या कामांना वेग आला आल्याचे चित्र आहे. दरम्यान, गुरुवारी, १२ जून रोजीनंतर मान्सून काही प्रमाणात सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गेल्या २४ तासात जिल्ह्यात तुरळक स्वरूपात पाऊस झाला आहे. सरासरी १.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच आगामी दोन ते तीन दिवसात ढगाळ तसेच आभ्राच्छादित वातावरणासह तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान असले तरी हवेतील ३६ टक्के आर्द्रतेनुसार प्रत्यक्षात ४२ अंश तापमान असल्याचे जाणवत आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरण होत आहे.
सोमवारपर्यंत हवामान ढगाळ तसेच तापमान ३९ ते २९ अंशा दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या पूर्वार्धात तुरळक ते मध्यम पावसाच्या सरीचा अंदाज आहे. जिल्ह्यात १२ जूननंतर मेघगर्जनेसह जोरदार ते मध्यम पावसासह मान्सून जोरदार सक्रिय होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.