Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Mehrun Lake was found : …अखेर मेहरूण तलावात बुडालेल्या ‘त्या’ तरूणाचा मृतदेह सापडला
    जळगाव

    Mehrun Lake was found : …अखेर मेहरूण तलावात बुडालेल्या ‘त्या’ तरूणाचा मृतदेह सापडला

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 8, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील मेहरुण तलाव परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांपैकी एका तांबापुरा येथील २३ वर्षीय तरूणाला पाण्याचा अंदाज न आल्याने शनिवारी, ७ जून रोजी दुपारी २ वाजता बुडाला होता. त्याचा रात्रीपर्यंत राबविलेल्या शोध मोहिमेनंतरही थांगपत्ता लागला नव्हता. अखेर रविवारी, ८ जून रोजी सकाळी ७ वाजता त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

    सविस्तर असे की, बकरी ईद असल्याने सुट्टी असल्याने शनिवारी, ७ जून रोजी दुपारी २ वाजता नदीम शेख त्याचे मेहुणे अझहर खान, मामेभाऊ इरफान शेख, तोहीत खान आणि मित्र मोहसीन खान यांच्यासह मेहरुण तलाव परिसरात गेला होता. उकाडा जाणवत असल्यामुळे सर्वजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. सुरुवातीला नदीम हा काठावर थांबला होता. परंतु नंतर तोही पाण्यात उतरला. पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यानंतर तो खोल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागला. मदतीसाठी धावलेले इतर तरुण त्याच्यापर्यंत पोहोचण्याआधीच नदीम पाण्यात बुडाला.

    नातेवाईकांनी मदत उशिरा पोहोचल्याचा प्रशासनावर केला आरोप

    घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस, अग्निशमन विभाग आणि महानगरपालिका यंत्रणेला देण्यात आली. मात्र, नातेवाईकांनी प्रशासनावर मदत उशिरा पोहोचल्याचा आरोप केला. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता पण नदीम सापडला नाही. रविवारी, ८ जून रोजी सकाळी ७ वाजता तलावात नदीमचा मृतदेह तरंगताना आढळून आला. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढून जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलविला. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. तसेच तांबापुरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी आ.सुरेश भोळे, तहसीलदार शीतल राजपूत यांच्यासह संबंधित अधिकारी दाखल झाले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.