Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Soni Nagar To Savkheda Road : सोनी नगर ते सावखेडा रस्त्यावर पथदिव्यांअभावी होतेय गैरसोय, रात्री श्वानांचा त्रास वाढला
    जळगाव

    Soni Nagar To Savkheda Road : सोनी नगर ते सावखेडा रस्त्यावर पथदिव्यांअभावी होतेय गैरसोय, रात्री श्वानांचा त्रास वाढला

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 5, 2025Updated:June 5, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मनपाने त्वरित दखल घेण्याची गरज : नागरिक आले दहशतीखाली

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील पिंप्राळा परिसरातील सोनी नगर ते सावखेडा रस्त्यावर विद्युत खांब आहे. पण पथदिव्यांअभावी रात्री वयोवृद्ध,महिला यांना अंधारातून पायदळ जावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील कुत्रे अंगावर धावून येत आहे. त्यामुळे नागरिक दहशतीखाली आले आहेत. यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासनाने त्वरित दखल घेऊन पथदिवे लावण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.

    शहरातील पांडुरंग साई नगर जवळील रस्त्यावर मासे विक्री केली जाते. त्यातील काही विक्रेते उरलेले किंवा खराब झालेले मासे आणि त्याचे अवशेष सर्रासपणे रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत उघड्यावर टाकून देतात. त्यामुळे अस्वच्छता तर वाढतेच पण परिसरात कुत्र्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढतो. हे कुत्रे रस्त्यावर टाकलेले मासे खाऊन हिंसक होत आहे.
    महिला, वृद्ध पायदळ जाताना रस्त्यावर अंधार असल्याने कुत्रे अंगावर धावून येत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    पथदिव्यांअभावी परिसरात रात्री पसरतोय अंधार

    शहरातील पिंप्राळा परिसरात नवीन वस्ती वाढली आहे. हा परिसर दिवस-रात्र वर्दळीचा रस्ता आहे. अशातच गणपती नगर, सोनी नगर, सुख अमृत नगर, बाबुराव नगर, ओमकार पार्क, विजय नगर, श्रीराम नगरकडे जात असताना विद्युत खांब आहे. मात्र, परिसरात पथदिव्यांअभावी रात्री उशिरा अंधारातून नागरिकांना पायदळ प्रवास करावा लागत आहे. त्यासोबतच मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. नागरिक मनपाला कर भरतात. मात्र, मनपा प्रशासनाने परिसरात पथदिव्याची सुविधा अद्याप दिलेली नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने त्यावर ठोस उपाय योजना करून त्वरित पथदिवे लावण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.