Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»District Level Haripath, Nirupan : संत कबीर जयंती, आषाढी वारी पर्वानिमित्त : ११ जूनला जिल्हास्तरीय हरिपाठ, निरूपण स्पर्धा
    जळगाव

    District Level Haripath, Nirupan : संत कबीर जयंती, आषाढी वारी पर्वानिमित्त : ११ जूनला जिल्हास्तरीय हरिपाठ, निरूपण स्पर्धा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 5, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    राष्ट्रजागृती वारकरी परिषदेतर्फे स्पर्धेचे आयोजन

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    संत कबीर जयंती आणि आषाढी वारी पर्वानिमित्त राष्ट्रजागृती वारकरी परिषदेतर्फे जिल्हास्तरीय हरिपाठ , निरूपण स्पर्धेचे बुधवारी, ११ जून रोजी सकाळी १० वाजता आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजन केले आहे. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा त्यानंतर सायंकाळी ५ वाजता बक्षीस वितरण तसेच सामूहिक पसायदानाने स्पर्धेची सांगता करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय समाज प्रबोधनकार ॲड. माईसाहेब महाराज पाटील यांनी सांगितले.

    वारकरी संत तत्वाचा प्रचार व प्रसार करणे तसेच हरीपाठाची संस्कृती शहरी भागात पसरविणे आणि भक्ती, प्रगल्भता, सत्य, संत चरित्र प्रसारित करणे असा स्पर्धेचा उद्देश असणार आहे. स्पर्धेचे नियम व अटी लागू केले आहे. सामूहिक हरिपाठ सादर करताना तीन टाळकरी, दोन गायक, एक मुर्दुंग वादक आवश्यक आहे. त्यात सांप्रदायिक व शास्त्रीय चालीचा उपयोग करावा. तसेच वेशभूषा, नियमबद्ध शिस्त असणे आवश्यक आहे.

    स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसे मिळणार

    एकल निरुपण सादर करताना हरिपाठातील एक अभंग निवडून त्यांचे सर्व चरण सोडविणे आहे. त्यासाठी ३० वर्ष वयाची अट ठेवली आहे. स्पर्धेत सामूहिक हरिपाठासाठी प्रथम पारितोषिक १० हजार रुपये, दुसरे ७ हजार तर तिसरे ५ हजार तसेच एकल निरुपण स्पर्धेत प्रथम पारितोषिक २ हजार तर दुसरे १ हजार रुपयाचे पारितोषिक ठेवल्याचे आयोजकांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.