Peace Committee meeting in Jalgaon : जळगावला शांतता समितीची बैठक : गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार : एसडीपीओ संदीप गावित

0
5

मुस्लिम बांधवांनी, समाजाने कायद्याचे पालन करण्याचे आवाहन

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

येथील जिल्हा अधीक्षक कार्यालयात जळगाव शहरातील हिंदू-मुस्लिम बांधवांची शांतता कमिटीची बैठक बकरी ईद चार समाज निमित्त आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी एसडीपीओ संदीप गावित होते. बैठकीत त्यांनी बकरी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी कोणत्याही प्रकारे गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन करू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. बैठकीला मुफ्ती हारून नदवी, अब्दुल करीम सालार, एजाज मलिक नगरसेवक रियाज बागवान, विश्वनाथ जोशी, सलीम इनामदार, सय्यद अयाज़ अली नियाज अली, फारुक कादरी, वाहेद खान, सय्यद चांद, दीपक जोशी, युसुफ पिंजारी, असलम कुरेशी, रफिक कुरेशी उपस्थित होते.

बंदी असलेल्या जनावरांची कुर्बानी करू नये

यावेळी उपस्थित सर्व जबाबदार लोकांनी समाजाला आव्हान केले की, बंदी असलेल्या जनावरांची कुर्बानी करू नये. ज्या पशूंची परवानगी आहे त्यात त्यांची कुर्बानी करावी. इतर बांधवांच्या धार्मिक भावनांचा आदर-सन्मान करावा, असे आवाहन केले.

यावेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी बबनराव आव्हाड, शनिपेठ पोलीस स्टेशनच्या प्रभारी कलमाकर अहिरे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. बैठकीत मेहरुण भागात कुर्बानीसाठी तीन दिवसांसाठी तात्पुरते स्लाटर हाऊसची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here