Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»If Stray Dogs Cannot Be Controlled : जळगावात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करता येत नसेल तर खुर्च्या खाली करा
    जळगाव

    If Stray Dogs Cannot Be Controlled : जळगावात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करता येत नसेल तर खुर्च्या खाली करा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 3, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शिवसेना शिंदे गटाने मनपाच्या आयुक्तांवर केला हल्लाबोल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील नागेश्वर कॉलनीत पिसाळलेल्या कुत्र्याने एका ४ वर्षीय बालकाचा बळी घेतला. त्यामुळे शहरात सध्या संतापाची लाट पसरली आहे. मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा चिमुकला बळी ठरल्याचे म्हणत शिवसेना शिंदे गटाकडून मंगळवारी, ३ जून रोजी तीव्र निषेध नोंदविला. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले. निवेदनाद्वारे मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासह विविध मागण्या केल्या आहेत. याप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी संतोष पाटील यांनी आयुक्तांसह प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांना धारेवर धरत ‘मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करता येत नसेल तर खुर्च्या खाली करा’, असा टोला लगावला.

    चार वर्षीय चिमुकल्याचा मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत मनपाच्या भोंगळ कारभारावर राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. अशात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मनपात आयुक्तांची भेट घेत निवेदन सादर केले. घटनेला जबादार कोण? असा प्रश्न यावेळी उपस्थित करत शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

    अधिकाऱ्यांनाही धरले धारेवर धरले…!

    शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी संतोष पाटील यांनी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे केली. त्यावर कायद्याच्या तरतुदीनुसार कुत्र्यांना ठार मारता येत नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. तेव्हा ‘आम्ही तुम्हाला कुत्र्यांना मारा’, असे कधी म्हणालो? असा संतप्त प्रश्न संतोष पाटील यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी अतिक्रमण, शहर स्वच्छता आदी विषयांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रशासनातील अधिकारी अतिक्रमणधारकांकडून हप्ते घेत आहेत. त्यामुळे समस्या कायम असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.

    यांची होती उपस्थिती

    निवेदन देतेवेळी सरिता माळी कोल्हे, शोभा चौधरी, भारती रंधे, ज्योती शिवदे, डॉ. सुषमा चौधरी, दीपमाला सुरवाडे, संतोष पाटील, ॲड. दिलीप पोकळे, सचिन सोनार, राहुल संगीले, सागर हिरवाळे, सचिन शिवदे, चेतन सनकत आदी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.