Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»‘Operation Sindoor’ : व्यसनमुक्तीसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविण्याची गरज : डॉ.नितीन विसपुते 
    जळगाव

    ‘Operation Sindoor’ : व्यसनमुक्तीसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविण्याची गरज : डॉ.नितीन विसपुते 

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 2, 2025Updated:June 2, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जैन इरिगेशनमध्ये ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त व्यसनमुक्तीवर केले मार्गदर्शन

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    भारतात दरवर्षी दहा लाख लोक व्यसनांमुळे मृत्युमुखी पडतात. त्यामुळे तितक्याच महिलांच्या कपाळाचे कुंकू पुसले जाते. खरं तर व्यसनमुक्तीसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे अवलंबण्याची गरज असल्याचे प्रतिपादन चेतना व्यसनमुक्तीचे संचालक डॉ. नितीन विसपुते यांनी केले. व्यसनमुक्तीनेच जीवन समृद्धीच्या दिशेने वाटचाल होऊ शकते, असेही ते म्हणाले. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त बांभोरीतील जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड प्लास्टिक पार्क आणि जैन फूड पार्क येथे सहकाऱ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देत त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. सकाळी जैन प्लास्टिक पार्कला आयोजित कार्यक्रमात त्यांनी कंपनीच्या सहकाऱ्यांशीही सुसंवाद साधला.

    ते म्हणाले की, देवाने माणसाचे जीवन सोपे केले. पण माणसानेच ते व्यसनांच्या आहारी जाऊन कठीण, गुंतागुंतीचे बनवले आहे, असे सांगत व्यसनांमुळे होणाऱ्या नुकसानांचे स्पष्ट चित्र उपस्थितांपुढे मांडले. व्यसनामुळे तोंड व शरीराचा दुर्गंध येतो, प्रतिकारशक्ती घटते, आनंददायक संप्रेरकांची निर्मिती कमी होते आणि व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा ढासळते, असेही त्यांनी नमूद केले. व्यसनमुक्त होण्यासाठी त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात राहणे, ध्यान धारणा करणे, कुटुंबियांशी संवाद वाढवणे आणि सजगता विकसित करणे हे उपाय सुचवले.

    डॉ. विसपुते यांनी गौतम बुद्धांचा अंतिम संदेश “मोह, माया सोडा आणि सजग रहा” त्याची आठवण करून दिली. १९१७ मध्ये राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या ‘एकच प्याला’ नाटकाचा संदर्भ देत असेही नमूद केले की, व्यसनाधिनतेची स्थिती १०८ वर्षानंतर आजही बदललेली नाही, ही खेदजनक बाब बोलून दाखविली. कार्यक्रमाच्या प्रारंभी कंपनीचे वरिष्ठ सहकारी सी.एस. नाईक यांनी प्रस्तावना केली. आपला एकही सहकारी व्यसनी नसावा हा विचार कंपनीचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांनी कंपनीच्या स्थापनेपासूनच करून त्यावर प्रत्यक्ष कृती केली. आज त्यांच्यानंतर पुढच्या पिढीनेही त्यात सातत्य ठेवले आहे. आजच्या दिवसानिमित्त प्रत्येकाने व्यसने सोडण्याचा संकल्प घेतला पाहिजे, असेही त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी झालेल्या प्रश्नोत्तराच्या सत्रात सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन किशोर बोरसे तर आभार डॉ. ज्ञानेश पाटील यांनी मानले.

    जैन फुड पार्कमधील सहकाऱ्यांशीही साधला संवाद

    जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर जैन फुड पार्क येथील कांदा निर्जलीकरण प्रकल्पातच्या ट्रेनिंग हॉल येथे सहकाऱ्यांसाठी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय पारख होते. प्रमुख पाहुणे म्हणून असलम देशपांडे, डॉ. अरुण चौधरी होते.

    डॉ. विसपुते म्हणाले की, व्यसनी व्यक्तीमुळे कुटुंबातील पत्नी आणि लहान मुलांचेही आरोग्य धोक्यात येते, हे त्यांनी अधोरेखित केले. व्यसन केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यावर परिणाम करत असल्यामुळे त्यातून बाहेर पडणे, ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात त्यांनी दोन महत्त्वाचे कानमंत्रही दिले. त्यात ‘१३८ फॉर्म्युला’ म्हणजे एक तास व्यायाम, तीन वेळा जेवण आणि आठ तासांची शांत झोप. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली की, मानवाला संगीत, सुगंध आणि ध्यानधारणा करणे आवडते. चांगल्या जीवनासाठी तीन गोष्टींमध्ये आपले मन गुंतवावे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. प्रास्ताविक संजय पारख यांनी केले. डॉ.नितीन विसपुते यांचा परिचय कंपनीच्या गृहपत्रिकेच्या संपादकीय मंडळाचे सदस्य किशोर कुलकर्णी यांनी करुन दिला. तसेच सूत्रसंचालन तथा आभारही मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.