Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Shubhshree Park, Chalisgaon : चाळीसगावातील शुभश्री पार्कमध्ये एकाच रात्री दोन घरफोड्या
    क्राईम

    Shubhshree Park, Chalisgaon : चाळीसगावातील शुभश्री पार्कमध्ये एकाच रात्री दोन घरफोड्या

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJune 1, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोरट्यांचा दीड लाखांच्या ऐवजावर डल्ला

    साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :

    शहरातील घाट रस्त्यावरील गोकुळधामच्या पाठीमागील शुभश्री पार्क कॉलनीत एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यात सुमारे १ लाख ५० हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज लांबविण्यात आला आहे. ही चोरीची घटना सोमवारी, २६ रोजी रात्री ११ ते मंगळवारी, २७ रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

    सविस्तर असे की, चाळीसगाव शहरातील शुभश्री पार्क येथील रहिवाशी दीपक राजेंद्र साळकर याने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, दीपक हा त्याची आई आणि बहीण असे तिघे सोमवारी, २६ रोजी रात्री पुढच्या हॉलमध्ये झोपले होते. पहाटेच्या सुमारास दीपक यांच्या आईला जाग आली. यावेळी बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा दरवाजा आतील बाजूने कोणीतरी लॉक केला होता.

    यावेळी दीपक यांना घराच्या बाहेर लोकांचा आवाज ऐकू आला. यावेळी चौकशी केल्यावर भाडेकरू असणारे मुकेश विरेंद्रकुमार रेजा यांच्याकडे चोरी झाल्याचे त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितले. दीपक साळकर यांनी मित्रांना फोन करून घरी बोलवून घेतले. दीपक यांनी मित्रासह घराच्या मागील बाजूने जावून पाहिले. यावेळी घराच्या बेडरूमचा मागील दरवाजाचा आतील कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केल्याचे दिसून आले. याप्रकरणी दीपक राजेंद्र साळकर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांनी कपाटातील १५ हजार रूपये रोख, ५० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे बाह्या, अंगठी, नथ, हार तसेच १० हजार रूपये किंमतीचे चांदीचे ब्रेसलेट असा सुमारे ७५ हजार रूपये किंमतीचा ऐवज लांबविला आहे.

    रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

    शुभश्री पार्क कॉलनीतील विरेंद्रकुमार रेजा यांच्या घरातही चोरी झाल्याचे समोर आले. रेजा यांच्या घरातून चोरट्यांनी २० हजार रूपयांची रोकड, ४० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे पंडल, १५ हजार रूपये किमतीच्या चांदीच्या बांगड्या व ग्लास, ५ हजार रूपये किंमतीचे पांढऱ्या रंगाचे मोती असा ८० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे समोर आले. अशा दोन्ही घरफोडीत चोरट्यांनी १ लाख ५० हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला. एकाच कॉलनीत एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पोलिसांनी चौकशी सुरू केली असून चोरांचा शोध घेणे सुरू केले आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई

    February 24, 2026

    Shirsoli : शिरसोलीत २३ वर्षीय तरुणाने मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या

    February 24, 2026

    Jalgaon: संशयावरून बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, पाच जण ताब्यात

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.