Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Rauf Band in Amalner : अमळनेरातील रऊफ बँडच्या संचालकाविरुद्ध कठोर कारवाई करा
    क्राईम

    Rauf Band in Amalner : अमळनेरातील रऊफ बँडच्या संचालकाविरुद्ध कठोर कारवाई करा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 28, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जिल्हा पोलीस अधीक्षकांना भाजपने दिले मागण्यांचे निवेदन

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    अमळनेर येथील ‘रऊफ बँड’चे संचालक अस्लम अली सय्यद याच्याविरुद्ध तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन जळगाव जिल्हा भाजपा महानगरच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना नुकतेच देण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदेश युवा उपाध्यक्ष भैरवी वाघ-पलांडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भारती सोनवणे, प्रदेश चिटणीस तथा माजी नगरसेविका सुरेखा तायडे, भाग्यश्री चौधरी, सरोज पाठक, मनोज भांडारकर, गजानन धीरज वर्मा यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

    अमळनेर तालुक्यातील धानोरी येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला ‘रऊफ बँड’चे संचालक अस्लम अली सय्यद याने फसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. याप्रकरणी चौफुली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रऊफ बँडच्या वाहनांचा गैरवापर करून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाहतूक व परिवहन नियमांचा भंग झाला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

    प्रशासनाने कठोर पावले उचलावी

    रऊफ बँडचे वाहन तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस तपासात समाविष्ट करावे. आरोपी अस्लम अली आणि त्याच्या सहकाऱ्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स (सीडीआर) तपासून संपूर्ण माहिती उघड करावी. या प्रकरणासंबंधी संपूर्ण पथकाची बारकाईने चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्याही निवेदनात नमूद आहेत. ही घटना समाजात भीती व अस्वस्थता पसरवणारी आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध होण्यासाठी प्रशासनाने त्वरित कठोर पावले उचलावी, अशी मागणीही भाजपाने निवेदनाद्वारे केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.