Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Protesting Against the Municipal Corporation : जळगावात मनपाचा निषेध करत मनसेचे अनोखे ‘खड्डे भरो’ आंदोलन
    जळगाव

    Protesting Against the Municipal Corporation : जळगावात मनपाचा निषेध करत मनसेचे अनोखे ‘खड्डे भरो’ आंदोलन

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 27, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शहरातील खड्ड्यांमध्ये झाडे लावण्याचा मनपाला दिला इशारा

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी, २७ मे रोजी ‘खड्डे भरो’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड.जमिल देशपांडे, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जनहितचे संदीप मांडोळे, प्रकाश जोशी, साजन पाटील, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर, विकास पाथरे, उमेश आठरे, विशाल जाधव, विनोद पाटील यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

    महानगरपालिका जिथे काम करू शकत नाही तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी जनतेला सोबत घेऊन श्रमदान करून स्वखर्चाने मुरूम आणून खड्डे बुजविण्यात आले. त्यामुळे महानगरपालिका, माजी नगरसेवक, आमदार, खासदार यांचे कोणतेही जनतेकडे लक्ष नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आक्रमतेचा पवित्रा हाती घेतला आहे. जळगाव शहरामध्ये ज्या-ज्या ठिकाणी खड्डे दिसतील त्या-त्या ठिकाणी आता झाडे लावण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार असल्याचा इशारा महानगरपालिकेला मनसेने दिला आहे.

    गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रीम कॉलनीचा सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे केवळ गैरसोयच नाही तर अपघातांचा धोकाही वाढला आहे. याच मुद्द्यावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने श्रमदान करुन ‘खड्डे भरो’ आंदोलन केले.

    मनसेने श्रमदान करुन बुजविले खड्डे

    जळगाव जिल्ह्यासह शहरात आता भाजपाचे खासदार, आमदार तसेच जळगाव शहराला लाभलेले तीन तीन मंत्री असूनही जळगाव शहराचा विकास होत नाही. त्यामुळे विकासाच्या केवळ गप्पा मारण्याचे काम विद्यमान लोकप्रतिनिधींकडून सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना विकास कसा करावा त्याचे उदाहरण आंदोलनाच्यामार्फत मंत्री महोदयांना दिले आहे. आंदोलनावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी श्रमदान करुन खड्डे बुजविण्याचे काम केले. त्यांचे सुप्रीम कॉलनी परिसरातील नागरिकांनी कौतुक करुन आभार व्यक्त केले आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.