Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Shocking incident in Rohanwadi : रोहनवाडीतील धक्कादायक घटना : आजीसह नातीला मारहाण, सोन्याची चेन तोडली
    क्राईम

    Shocking incident in Rohanwadi : रोहनवाडीतील धक्कादायक घटना : आजीसह नातीला मारहाण, सोन्याची चेन तोडली

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 25, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव तालुका पोलिसात चार महिलांविरुध्द गुन्हा दाखल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरापासून जवळील आव्हाणे शिवारातील रोहनवाडी येथे नातीला शिकवणाऱ्या शिक्षिकेचा पत्ता न दिल्याच्या कारणावरून एका महिलेसह तिच्या नातीला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडून नुकसान केल्याचा प्रकार २४ मे रोजी सकाळी ११ वाजता घडला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार महिलांविरुध्द गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात आले.

    सविस्तर असे की, रोहनवाडी येथे राहणाऱ्या सुनंदा आनंद निकम (वय ५७) यांच्याकडे मंगल मुरलीधर सुरवाडे, अश्विनी शालिक सुरवाडे, गीता धनराज वाघ आणि सरिता संजय दांडगे (सर्व रा. महादेव नगर, जळगाव) अशा चार महिला आल्या होत्या. त्यांना सुनंदा निकम यांच्या नातीला शिकवणाऱ्या शिक्षिकेचा पत्ता हवा होता. मात्र, सुनंदा निकम यांनी चौघांना पत्ता देण्यास नकार दिला. त्याच रागातून चौघींनी मिळून सुनंदा निकम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

    चौघा महिलांनी केली मारहाण

    ‘माझ्या आजीला मारू नका’ असे बोलल्याने त्यांची नात वंक्षिकालाही चौघा महिलांनी मारहाण केली. त्यांच्या झटापटीत सुनंदा निकम यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि नाकातील नथ तोडून नुकसान झाले. त्यानंतर सुनंदा निकम यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या तक्रारीवरून चारही महिलांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.कॉ. जितेंद्र तायडे करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.