Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Woman In Jalgaon Has Ended : जळगावातील गंभीर भाजलेल्या महिलेची महिन्याभरापासूनची मृत्यूशी ‘झुंज’ संपली
    जळगाव

    Woman In Jalgaon Has Ended : जळगावातील गंभीर भाजलेल्या महिलेची महिन्याभरापासूनची मृत्यूशी ‘झुंज’ संपली

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 22, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गॅस गळतीचा बळी : उपचारावेळी महिलेचा अखेर मृत्यू

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    गेल्या महिन्यांपूर्वी स्वयंपाक करत असताना गॅस गळतीमुळे गंभीररित्या भाजलेल्या जळगावातील रामेश्वर कॉलनीतील ५० वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी, २२ मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांची महिन्याभरापासून मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर संपली आहे. उषा गुलाब मोरे असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूमुळे मोरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

    सविस्तर असे की, उषाबाई मोरे ह्या आपला मुलगा सोनू आणि सून यांच्यासोबत रामेश्वर कॉलनीतील घरात वास्तव्याला होत्या. सुमारे एक महिन्यांपूर्वी त्या नेहमीप्रमाणे गॅसवर स्वयंपाक करत असताना अचानक सिलेंडरच्या नळीतून गॅसची गळती सुरू झाली. क्षणातच अशा गळतीमुळे आग भडकली आणि उषाबाई मोरे ह्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आगीमुळे त्या गंभीररित्या भाजल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच त्यांना तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

    जखमांवरील उपचार ठरले ‘अपयशी’

    गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, भाजल्यामुळे झालेल्या गंभीर जखमांवर उपचारांना यश आले नाही. अखेर गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उषाबाईंच्या निधनाची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.