Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Shivaji Nagar area : शिवाजी नगर परिसरात पिस्तुलाशी खेळताना गोळीबार ; तरुण जखमी
    क्राईम

    Shivaji Nagar area : शिवाजी नगर परिसरात पिस्तुलाशी खेळताना गोळीबार ; तरुण जखमी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 15, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल, एकाला घेतले ताब्यात

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    भुसावळ येथे तृतीयपंथींचा कार्यक्रम पाहून परत येत असलेल्या तीन मित्रांपैकी एकाच्या निष्काळजीपणामुळे जळगाव-भुसावळ मार्गावर गंभीर घटना घडली. गाडीत बसून गावठी पिस्तुलाशी खेळताना चुकून गोळी झाडली गेल्याने नाजिम पटेल नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना जळगाव शहरातील शिवाजी नगर परिसरात घडली. याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    सविस्तर असे की, तोहित देशपांडे आणि नाजिम पटेल हे दोघे आपल्या एका अन्य मित्रासोबत भुसावळ येथे तृतीयपंथींचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री सुमारे अडीच वाजता ते पाळधीकडे परतत होते. प्रवासादरम्यान मागच्या सीटवर बसलेला तोहित देशपांडे हा एका गावठी पिस्तुलाशी खेळत होता. पिस्तुलाचे ट्रिगर दाबून तो त्याची तपासणी करत असताना त्यातून अचानक गोळी सुटली. त्यानंतर ती समोरच्या सीटवर बसलेल्या नाजिम पटेलच्या पाठीत घुसली. गोळी लागताच गाडीतील सर्व मित्र घाबरले. त्यांनी तात्काळ नाजिमला जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, घटनेनंतर गोळी झाडणारा मित्र तोहित देशपांडे स्वतःहून स्थानिक गुन्हे शाखेत शरण आल्याचे सांगण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.