Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»Tukaram Wadi area: तुकाराम वाडी परिसरात अनेक घरांवर हल्ला, वाहनांची तोडफोड
    क्राईम

    Tukaram Wadi area: तुकाराम वाडी परिसरात अनेक घरांवर हल्ला, वाहनांची तोडफोड

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 15, 2025Updated:May 15, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मध्यरात्री टोळक्यांकडून गुंडागर्दी, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी :

    शहरातील तुकाराम वाडी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास काही तरूणांसह इतरांनी हैदोस घातला. तुकाराम वाडी परिसरात सुरेश ओतारी यांच्या खून प्रकरणातून सुरू असलेल्या वादातून काही तरूणांनी परिसरात राहणाऱ्या महिलांसह इतरांच्या घरांवर दगडफेक करून दमदाटी केली तर काही वाहनांची तोडफोड करून नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शारदा सुकलाल ठाकुर (वय ४०, रा. तुकाराम वाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

    एमआयडीसी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरेश ओतारी यांच्या खून प्रकरणातून सुरू असलेल्या वादातून स्वप्निल उर्फ गोलू धर्मराज ठाकुर, निशांत प्रताप चौधरी, अरुण उर्फ टीनू भीमराव गोसावी, मुन्ना पहिलवान, पारस सोनवणे, बेंडा अज्या, गौरव मिस्तरी आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहा अज्ञात तरुणांनी मिळून हा प्रकार केला. असे सांगत त्यांनी नमूद केले आहे की, त्या पती सुकलाल आणि दोन मुलींसोबत घरात झोपलेल्या असताना मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या पुढील लाकडी दरवाज्यावर लाठ्या-काठ्या आणि दगडांचा वर्षाव सुरू झाला. बाहेर मुलांच्या आरडाओरडीचा आवाज येत होता. घाबरलेल्या शारदा आणि त्यांचे पती यांनी दरवाजा अर्धवट उघडल्यावर समोर स्वप्निल उर्फ गोलू ठाकुर आणि त्याचे साथीदार दुचाकी गाड्यांवर उभे होते. गोलू ठाकूरने त्यांना पाहून अश्लील शिवीगाळही केली.

    सम्राट कॉलनीतही नुकसान

    टोळक्याने कल्पना दिलीप बाविस्कर यांच्या घराचा दरवाजा तोडून आत घुसून त्यांना आणि त्यांची सून प्रियंका प्रफुल बाविस्कर यांनाही शिवीगाळ केली. त्यांच्या घरासमोर लावलेली होंडाशाईन मोटरसायकलचे नुकसान केले. त्यानंतर गुंडांनी शारदा ठाकुर यांच्या घराच्या मागच्या गल्लीत राहणाऱ्या रुपाली विजय पवार यांच्या घराच्या खिडकीवर ठेवलेला कूलर खाली फेकून त्याचे नुकसान केले. तसेच त्यांच्या घरासमोर गटारीवर ठेवलेले वॉशिंग मशीन आणि पाण्याच्या टाक्याही फोडून टाकल्या. असे करुनही त्या टोळक्याचा हैदोस इथेच थांबला नाही. त्यांनी सम्राट कॉलनीत जाऊन तेथे राहणाऱ्या सविता भगवान महाजन यांच्या घराच्या खिडकीची काच फोडली आणि घरासमोर लावलेली पल्सर मोटरसायकल व सायकलवर दगड व लाकडी दांडके मारून त्यांचेही नुकसान केले, असे शारदा ठाकुर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

    सात जणांसह सहा अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल

    याप्रकरणी स्वप्निल उर्फ गोलू धर्मराज ठाकुर, निशांत प्रताप चौधरी, अरुण उर्फ टीनू भिमराव गोसावी, मुन्ना पहिलवान, पारस सोनवणे, बेंडा अज्या, गौरव मिस्तरी यांच्यासह इतर पाच ते सहा अज्ञात व्यक्तींविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगावात खान्देश महोत्सव २०२६ ची भव्य सुरुवात; महिला उद्योजकतेला प्रोत्साहन

    February 27, 2026

    Jalgaon : २५ वर्षांनंतरही जमीन मोबदला न दिल्याबद्दल आयुक्तांना नोटीस

    February 27, 2026

    Jalgaon :जळगाव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीवर कोल्हे यांची निवड

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.