उपस्थित मान्यवरांकडून सागर सोनवणे यांच्या कार्याचे कौतुक
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
धरणगाव तालुक्यातील पाळधीतील सावदा रस्त्यालगत सागर सोनवणे यांच्या मालकीच्या ‘सागर स्टोन क्रेशरच्या’ हॉटमिक्स प्लांटचे आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते शनिवारी, ३ मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी वसंत अण्णा सोनवणे, डॉ.शांताराम सोनवणे, सुमनबाई सोनवणे, माजी आ.लताताई सोनवणे, माजी महापौर राखीताई सोनवणे, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, माजी नगरसेवक मन्नुदादा सोनवणे, शामकांत सोनवणे, नरेश सोनवणे, राहुल सोनवणे, संभाजी सोनवणे, विशाल सोनवणे, अमित सोनवणे, विक्रम सोनवणे, धीरज सोनवणे, परेश बऱ्हाटे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सागर स्टोन क्रेशरचे संचालक सागर सोनवणे हे स्व.बळीराम सोनवणे यांचे नातू आहेत. ते सध्या पुणे येथे एमआयटीचे उच्च शिक्षण घेत आहे. गेल्या चार वर्षांपासून ते गर्व्हेमेंट कॉन्ट्रॅक्टरच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी अतिशय कमी वयात उंच भरारी घेतली आहे. त्यांनी उच्चस्तरीय रस्त्यांची कामे केली आहेत. तसेच त्यांनी उच्च शिक्षणासोबत रस्त्यांच्या कामांसाठी लागणाऱ्या डांबरच्या मशिनची माहिती घेऊन मशिनरी अद्ययावत करुन त्यांनी या क्षेत्रात आपला ठसा उमटविण्याचे कार्य धडाडीने सुरु केले आहे.
यांचे लाभले मार्गदर्शन
कार्यक्रमाप्रसंगी सागर सोनवणे यांच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करुन भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. सागर सोनवणे यांना स्व. बळीराम सोनवणे, आ.चंद्रकांत सोनवणे, बाजार समितीचे सभापती शामकांत सोनवणे, नाना सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.