दोन चिमुकल्यांचा विनयभंग

0
24

दोन चिमुकल्यांचा विनयभंग

जळगाव (प्रतिनिधी)

शहरातील एका भागात दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लिल चाळे करत ३५ वर्षीय तरुणाने विनयभंग केल्याची घटना २३ मार्चरोजी पहाटे घडली आहे. रात्री ११ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरात ६ आणि ९ वर्षीय या दोन अल्पवयीन मुली परिवारासह वास्तव्याला आहे. संशयित आरोपी मनोज धनगर याने या दोन्ही मुलींसोबत अश्लील चाळे करत त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार २३ मार्चरोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडला

नंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी शनीपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली रात्री ११ वाजता संशयित आरोपी मनोज धनगरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here