युवराज कोळी हत्याकांडातील फरार पिता पकडला पोलिसांनी केला जेरबंद
जळगाव (प्रतिनिधी)-
कानसवाडा-शेळगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्या खूनाच्या गुन्ह्यात भरत पाटील या तिसऱ्या संशयितास नशिराबाद पोलिसांनी रविवारी अटक केली.
युवराज कोळी यांचा २१ मार्चरोजी सकाळी खून करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये भरत पाटील, त्यांची दोन्ही मुले देवेंद्र पाटील आणि परेश पाटील या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता यादोघेही भावंडांना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांना २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे
दरम्यान तिसरा संशयित आणि फरार असलेला पिता भरत पाटील याला नशिराबाद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याने शिताफीने अटक केली. सपोनि ए. सी. मनोरे, सहायक फौजदार संजय महाजन, पोहेकॉ. शरद भालेराव, शिवदास चौधरी, पोकॉ सागर बिडे यांनी अटकेची कार्यवाही पूर्ण केली.