राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत उन्हाळी हंगामासाठी
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
जळगाव (प्रतिनिधी ) –
राष्ट्रीय खाद्यतेल अभियाना (तेलबिया) मध्ये बियाणे, औषधे, खते विभागाअंतर्गत बियाणे घटकामध्ये भुईमुग किंवा तीळ पिकांसाठी प्रमाणित बियाणे वितरण या घटकासाठी अर्ज करण्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत. १३ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.
उन्हाळी हंगाम २०२४-२५ अंतर्गत उन्हाळी भुईमुग व तीळ पिक समुहांतर्गत १०० टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. भुईमुग पिकासाठी कोल्हापूर , सातारा , सांगली , पुणे , अहिल्यानगर , नाशिक , धुळे , छत्रपती संभाजी नगर या ८ जिल्ह्यांतील शेतक-यांना व तीळ पिकासाठी जळगाव , लातूर , बीड , बुलडाणा या जिल्ह्यांतील शेतक-यांना लाभ देण्यात येणार आहे.
महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या पोर्टलवर अर्ज करून जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सह संचालक , जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी , उप विभागीय कृषी अधिकारी , तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.