Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रावेर»रावेर विधानसभा मतदारसंघात डॉ.नरेंद्र महाले यांचे मतदार जनजागृती अभियान ठरतेय कौतुकास्पद
    रावेर

    रावेर विधानसभा मतदारसंघात डॉ.नरेंद्र महाले यांचे मतदार जनजागृती अभियान ठरतेय कौतुकास्पद

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoNovember 15, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    संपूर्ण जिल्ह्याभरात मतदान जनजागृतीपर कार्यक्रम सुरू

    साईमत/यावल/प्रतिनिधी

    रावेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणातील सर्व उमेदवार आपआपल्या पक्ष ध्येय, उद्दिष्ट, धोरणानुसार तसेच अपक्ष उमेदवार आपल्या नियोजनानुसार प्रचार करीत असले तरी शासनातर्फे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी तसेच मतदार जनजागृती करण्यासाठी शासनाने विविध उपक्रम आयोजित केले आहे. अशा सर्व उपक्रमात यावल येथील सरस्वती विद्या मंदिरातील डॉ.नरेंद्र महाले यांचे नि:पक्षपणे मतदार जनजागृती अभियान लक्षवेधी व कौतुकास्पद ठरत आहे. त्यामुळे नक्कीच मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणार असल्याचे शासकीय यंत्रणेकडून सांगितले जात आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अकलाडे तसेच जिल्हा सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिकच्या कल्पना चव्हाण यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण जिल्ह्याभरात मतदान जनजागृतीपर कार्यक्रम सुरू आहे.

    महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ ला असल्याने यावल, रावेर तालुक्यात प्रबोधनाचे कार्य शिक्षण विभागाच्यावतीने अत्यंत जोमाने होत आहे. त्यामध्ये प्रत्येक मतदारांमध्ये मतदानाची जागृती करत असताना ठिकठिकाणी मतदानाच्या संदर्भात प्रबोधन केले जात आहे. त्यामध्ये मतदान करणारा प्रत्येक मतदार व त्याच्या कर्तव्याविषयी त्याला जाणीव करून दिली जात आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी विशेष गाण्यांच्या माध्यमातून, नाटिकांच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य सुरू आहे. त्यासाठी यावल येथील सरस्वती विद्यामंदिरच्यावतीने विशेष लक्षवेधी पद्धतीने भारुडाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

    समाजातील विविध मतदारांना आपल्या मतदानाच्या हक्काच्या संदर्भात जाणीव जागृती करून देत मतदार संघात ठिकठिकाणी व यावल शहरात भारुड सादर करण्यात आले. भारुडाचे लेखन दिग्दर्शन डॉ.नरेंद्र महाले यांनी केले आहे. मुख्याध्यापक जी.डी.कुळकर्णी यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यामध्ये संचित कोळी,यश वारके, विनायक महाजन, डॉ.नरेंद्र महाले यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारत भारुडाचे सादरीकरण केले.

    मतदान जनजागृतीमुळे प्रबोधनाचे कार्य

    यावल परिसरासह मतदारसंघात प्रबोधनाचे कार्य खूप चांगल्या व नियोजन पद्धतीने करण्यात आले. त्यात त्यांना सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावल पंचायत समितीच्या बीडीओ डॉ. मंजुश्री गायकवाड, गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांचे सहकार्य लाभत आहे. त्यामध्ये यावल तालुक्याचे मतदान प्रबोधन सेलिब्रिटी म्हणून शिक्षण विभागाच्यावतीने डॉ.नरेंद्र महाले प्रबोधनाचे कार्य करत आहेत.

    मतदान जनजागृतीला मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

    यावल येथील सरस्वती विद्या मंदिराचे मुख्याध्यापक जी.डी. कुलकर्णी हे त्यांच्यासोबत प्रबोधनाचे कार्य करीत आहे. रावेर विधानसभा मतदार संघामध्ये भरघोस मतदान होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांचेही योगदान लाभत आहे. लोकशाहीचे महत्त्वाचे दान म्हणजे मतदान हे करण्यासाठी प्रबोधनाचे समाजसेवेचे काम रावेर मतदारसंघात अत्यंत कौतुकास्पद पद्धतीने सुरू आहे. सरस्वती विद्यामंदिर यांच्या पुढाकाराने सामाजिक कार्याची जाणीव होत आहे. त्यात प्रामुख्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून रावेर विधानसभा मतदार संघात सरस्वती विद्यामंदिराचे उपशिक्षक डॉ.नरेंद्र महाले यांची महत्त्वाच्या भूमिकेत मतदारांमध्ये जनजागृती करताना त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Savda, Taluka Raver: भीषण अपघात भरधाव मोटारसायकलच्या धडकेत पादचारी ठार

    February 23, 2026

    Savda : सावदात भीषण आग! पाच दुकाने जळून खाक, लाखोंचे आर्थिक नुकसान

    February 4, 2026

    Raver : रावेरजवळ समोरासमोर धडक; दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

    February 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.