Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»कल्याणी नगरला महिलांचा भुलाबाई महोत्सव आनंदात साजरा
    जळगाव

    कल्याणी नगरला महिलांचा भुलाबाई महोत्सव आनंदात साजरा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 18, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गुलाबाईनिमित्त एकत्रित आल्यानंतर महिलांचा आनंद द्विगुणित

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी

    शहरातील कल्याणी नगरमधील महिलांनी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भुलाबाई महोत्सव आनंदात साजरा केला. सर्व महिलांसाठी ही एक पर्वणीच होती. ह्या महिला अलका पितृभक्त यांच्याकडे जमल्या. सुरुवातीला गुलाबाईचे गाणे म्हटले. ‘पहिली ग गुलाबाई’, ‘सा बाई सू’, ‘येथून राळा पेरत जाऊ’, ‘आरडी एवढं परडी ग’… अशी विविध गाणी टिपरीच्या आणि टाळ्यांच्या तालावर नृत्यासह सादर केले. महिलांना असे वाटत होते की, खरोखर आपण अगदी लहान असताना गुलाबाईचा जो आनंद होता तसाच आनंद उपभोगला.

    यावेळी स्पर्धेचेही आयोजन केले होते. त्यात प्रथम द्वितीय तेजुकडे यांनी बक्षीस मिळवले. नंतर चिठ्ठ्यांचा खेळ घेण्यात आला. चिठ्ठीत जे लिहिले असेल ते कृती करणे, यात तर फारच गंमत आले चिठ्ठी उचलताना मनात कुतूहल निर्माण होत होते बाई ग !!!काय असेल? माझ्या चिठ्ठीत प्रत्येकीने चिठ्ठीचा खेळ खेळला आणि आनंद व्यक्त केला.

    यानंतर गुलाबाईची आरती करण्यात आली आणि मग खाऊ जिंकणे “गुलाबाई गुलाबाई खाऊच काय जिंकला नाही तर मिळणार नाय’’ असा गलका करत एकच हशा पिकला. प्रत्येकीला आपला खाऊ ओळखण्याची उत्सुकता लागली. नंतर सर्व खाऊ जिंकून झाल्यावर एकत्र केला.सोबत गरमागरम पाव वडा, जिलेबी, केशर दूध यांचा आस्वाद घेतला.

    सर्वांनी घेतला एकमेकांचा निरोप

    कार्यक्रमाचे नियोजन अलका गोविंद पितृभक्त यांनी केले होते. कार्यक्रमात सुमन बाविस्कर, रंजना शिंपी, राधा महाजन, छाया जाधव, पुष्पा रसाळकर, सुमन गवळी यांच्यासह सर्व कॉलनीतील महिला सहभागी झाल्या होत्या. असा आनंद पुन्हा मिळावा, असे वक्तव्य करत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला. गुलाबाई निमित्त एकत्रित आल्यानंतर त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Faizpur : अकलूद शिवारात भव्य शिवमहापुराण कथा

    March 1, 2026

    Akulkheda (Tal. Chopra) :रागाच्या भरात प्रेयसीवर गोळी; नंतर प्रियकराची आत्महत्या

    March 1, 2026

    Jalgaon : मेहरूणमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना

    March 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.