Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»भरवस्तीत महिलेचा निर्घृण खून
    क्राईम

    भरवस्तीत महिलेचा निर्घृण खून

    saimatBy saimatOctober 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     शहरातील गणेशवाडी परिसरात उडाली खळबळ

    साईमत/जळगाव/ न.प्र.

    शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये एका महिलेच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी, १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. सुवर्णा राजेश नवाल (वय ५७, रा. रणछोड नगर, गणेश वाडी, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे.

    सविस्तर असे की, जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये सुवर्णा नवाल या महिला आपल्या पती राजेश नवाल यांच्यासह वास्तव्याला होत्या. त्यांचे पती राजेश नावाल हे दाणा बाजार परिसरात धान्याचे व्यापारी आहेत. दरम्यान गुरुवारी, १० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या पूर्वी सुवर्णा नवाल या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात घुसून लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला.

    दरम्यान, रात्री ८.३० वाजता मयत सुवर्णा नवल यांचे पती राजेश नवाल हे घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला. यासंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनांसाठी धाव घेतली. पुढच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. भरवस्तीमध्ये एका महिलेचा खून करण्यात आल्याने शहरामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात पती राजेंद्र नवाल, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Savda: सावदा शहरातील ‘भारत गादी भंडार’ला भीषण आग तब्बल ३ लाखांचे नुकसान

    March 13, 2026

    Jalgaon : जळगावात व्यापाऱ्याचा अकस्मात मृत्यू पेट्रोल पंपावर पडून चक्कर आली

    March 13, 2026

    Bhusawal:भुसावळ-जामनेर महामार्गावर ट्रकला अचानक आग लागली

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.