विविध विकासात्मक कामांच्या भूमिपूजनप्रसंगी आ.राजेश एकडे यांचे प्रतिपादन
साईमत/मलकापूर/प्रतिनिधी
मतदार संघामध्ये विकासात्मक कामे करण्यावरच भर राहिला आहे. मतदार संघाचा सर्वांगिण विकास हेच ध्येय ठेवले. त्या माध्यमातून प्रत्येक विकासात्मक करण्याचा प्रवासात्मक कलम समर्थ साथ असेपर्यंत हा विकासाचा झंझावात असाच कायम ठेवणार असल्याचे प्रतिपादन आ. राजेश एकडे यांनी केले. तालुक्यातील विविध विकासात्मक कामांचा भूमिपूजन सोहळा नुकताच घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
मलकापूर विधानसभा मतदार संघात आ. राजेश एकडे यांनी आतापर्यंत भरीव असा विकासात्मक निधी खेचून आणत हजारो कोटी रूपयांची कामे केली. आता सुध्दा विविध विकासात्मक कामांकरीता ५० कोटी १८ लाखांचा भरीव असा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मलकापूर तालुक्यातील बेलाड, घिर्णी, माकनेर, उमाळी, वाकोडी, वरखेड, लासुरा, भाडगणी, पिंपळखुटा बु., निमखेड, दाताळा अशा गावांमध्ये विविध विकासात्मक कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. याप्रसंगी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.