मालापूर शिवारातून ४५ लाखांचा ओला गांजा जप्त

0
13

चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई

साईमत/चोपडा/प्रतिनिधी

तालुक्यातील मालपूर शिवारात रुमाल्या चेचऱ्या पावरा (रा. डेडियापाडा, ता. चोपडा) हा कसत असलेल्या नवाड शेत जमीन कम्पार्टमेंट नंबर २११ मध्ये प्रतिबंधित असलेला मानवी मेंदूवर विपरित परिणाम करणारा ७५० किलो वजनाचा ४५ लाख रुपये किमतीचा गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे, वनस्पतीच्या झाडांची स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड करुन त्याचे संवर्धन व जोपासना करत होता. त्याठिकाणी पोलीस आल्याचे पाहून आरोपी रुमाल्या चेचऱ्या पावरा हा तेथून पसार झाला आहे.

याप्रकरणी त्याच्याविरुध्द चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here