जिल्हाधिकाऱ्यांंसह तहसिलदारांची लाभणार उपस्थिती
साईमत/फैजपूर/प्रतिनिधी :
श्री संभाजी राजे दुर्गोत्सव मित्र मंडळ साई ग्रुप फैजपूर यांच्यावतीने एकाच ठिकाणी वणी गड निवासी सप्तश्रंृगी माता, माहूर निवासिनी रेणुका माता, कोल्हापूर निवासिनी महालक्ष्मी माता, तुळजापूर निवासिनी भवानी माता अशा साडेतीन शक्तीपिठांची एकाच ठिकाणी स्थापना केली आहे.
त्याच ठिकाणी रविवारी, ६ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडे सात वाजता माता जागरण व भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन कै.दयावती कन्हैयालाल वर्मा यांच्या स्मरणार्थ बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) येथील गायक रोशनी चंदवाणी व विशाल उंदकारे यांच्या मधुर वाणीतून माता जागरण व भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सोमवारी, ७ऑक्टोबर रोजी युवा कीर्तनकार शब्दप्रभू भरत महाराज म्हैसवाडीकर यांचे जाहीर कीर्तन सायंकाळी साडे सात वाजता आयोजित केले आहे.
त्याचसोबत मंगळवारी, ८ ऑक्टोबर रोजी याच ठिकाणी सामूहिक महाआरती व ५६ भोग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाला जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यावलच्या तहसीलदार मोहन माला नाझिरकर यांची उपस्थिती लाभणार आहे. सर्व कार्यक्रमांचा शहरवासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संभाजी राजे दुर्गोत्सव मित्र मंडळ, साई ग्रुप यांच्यावतीने मंडळाचे अध्यक्ष सचिन साळी, उपाध्यक्ष यश वर्मा, देवा चौधरी, देविदास कोष्टी, प्रांजल कपले, ईश्वर भंगाळे, झिल वर्मा, चेतन चौधरी, जितू नेमाळे यांच्यावतीने केले आहे.