पोस्को कायद्याअंतर्गंत तरुणाविरोधात गुन्हा दाखल
साईमत/वरणगाव/प्रतिनिधी :
भुसावळ तालुक्यात एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणा विरोधात पोस्को कायद्याअंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, तालुक्यातील एका गावात आपल्या घरात मुलगी अंगावरचे कपडे बदलवित असताना मुलीच्या आईला मुलीचे पोट मोठे दिसल्याने तिच्या आईने तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आईला धक्काच बसला. कारण मुलीच्या पोटात सहा महिन्याचा गर्भ असल्याचे मुलीने सांगितले. पीडित मुलीने घटनेबाबत हकीकत सांगितल्यानुसार घराशेजारील राहणारा निलेश संजु निळे या तरुणाने सात महिन्यांपूर्वी (दिवस वेळ निश्चीत माहित नाही) त्याच्या घरात मला जबरदस्तीने घरातील हॉलमध्ये नेऊन अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा ५ सप्टेंबर २०२४ रोजी घरात बोलावून अत्याचार केल्याची हकीकत पीडित मुलीने तिच्या आईला सांगितल्याने ही घटना उघडकीस आली.
याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून निलेश संजु निळे याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिताच्या कलम ६४ (२) (M) ३५१ (१) (२) पोस्को कायद्याचे ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सह पोलीस निरीक्षक सुशिल सोनवणे करीत आहे.