Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»सोयगाव पोलिसांसह सतर्क नागरिकांनी चोरट्यांचा डाव उधळला
    क्राईम

    सोयगाव पोलिसांसह सतर्क नागरिकांनी चोरट्यांचा डाव उधळला

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोरटे झायलो गाडीसह चोरीच्या गायी सोडून अंधाराचा फायदा घेत पसार

    साईमत/सोयगाव/प्रतिनिधी :

    बनोटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास झायलो गाडीत आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी सोयगावमधील आमखेडा गावातून तसेच पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील चोरी केलेल्या दोन गायी झायलो गाडीत गायींना बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन देऊन धूम ठोकली. मात्र, ही घटना पिंपळगाव हरेश्वर येथील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी परिसरात चोरट्यांचा तपास सुरू केला. परिसरातील इतर गावातील नागरिकांनाही याबाबत माहिती दिली.

    झायलो गाडीत चोरीच्या गायी कोंबून घेऊन जाणाऱ्या चोरट्यांनी तिडका गावाजवळील पोलिसांनी नाकाबंदीसाठी लावलेले बॅरिकेट उडवून भरघाव वेगाने नागद रस्त्याने निघाले. मात्र, पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख, जमादार राजू बर्डे, अंमलदार श्रीकांत तळेगावे, संदीप सुसर यांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. मोहळाई येथील सरपंच संदीप राठोड यांना याबाबत मोबाईलद्वारे माहिती दिली. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मोहळाईजवळ रस्त्यावर टॅक्टर आडवा लावून चोरीच्या गायी घेऊन येणाऱ्या झायलो गाडीला अडविली. मात्र, गाडीतील अज्ञात तीन चोरटे गाडी तिथेच सोडून अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाले.

    गाडीसह दोन गायी ताब्यात

    पोलिसांनी गाडीसह दोन गायी ताब्यात घेऊन मूळ मालक यांना कारवाईनंतर ताब्यात देऊन चोरीसाठी वापरण्यात आलेली झायलो गाडी जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख, जमादार राजू बर्डे, पोलीस अंमलदार श्रीकांत तळेगावे, संदीप सुसर, विकास दुबिले करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Pachora : तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याला पाचोरात रंगेहात अटक

    February 19, 2026

    Jalgaon / Wakdi : महसूल पथकाला पाहताच ट्रॅक्टर चालक घेवून पसार वाळूमाफियाचा कारनामा 

    February 17, 2026

    Dharangaon : धरणगाव औद्योगिक वसाहतीतील भंगार गोडाऊन खाक

    February 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.