Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रायसोनी महाविद्यालयातील “एमबीए”च्या विद्यार्थ्यांचा स्टार अँग्रो कंपनीला अभ्यासदौरा
    जळगाव

    रायसोनी महाविद्यालयातील “एमबीए”च्या विद्यार्थ्यांचा स्टार अँग्रो कंपनीला अभ्यासदौरा

    saimatBy saimatSeptember 24, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    औद्योगीक दौऱ्यात विध्यार्थ्यानी जाणून घेतली कामकाजाची माहिती

    साईमत / जळगाव / प्रतिनिधी
    येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा जळगाव शहरालगत असलेल्या “स्टार अँग्रो कंपनी” येथे अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष एमबीए शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते.

    या क्षेत्रभेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच औद्योगिक कार्यप्रणाली कशी चालते. कच्चा मालावर प्रक्रिया करून पक्का माल कशा पद्धतीने तयार केला जातो. त्याची साठवणूक, हिशोब पद्धती, वितरण पद्धती, अत्याधुनिक उत्पादन प्रक्रिया, ऑटोमेशन, निर्यात, वित्त आणि एचआर या सर्व बाबींची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात नेऊन समजावी व त्याचा उपयोग भावी काळात व्हावा यासाठी या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते असे संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी या दौऱ्याची पार्श्वभूमी सांगताना नमूद केल.

    महाराष्ट्रातील किंबहुना देशातील कोल्ड ड्रिंक उद्योग क्षेत्रातील बळकटीकरणासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या स्टार अँग्रो कंपनीला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची कार्यपद्धती आणि कामकाज जाणून घेण्याची संधी जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मिळाली. या अभ्यासदौऱ्यात स्टार अँग्रो कंपनीमधील प्लांट व्यवस्थापक जावेद शेख यांनी इंडस्ट्रीजमधील विविध बारकावे सांगत मार्गदर्शन केले. सरतेशेवटी चर्चासत्रांची सांगता प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाने झाली. रायसोनी महाविद्यालयाच्यावतीने प्रा. डॉ.विशाल राणा यांनी या अभ्यास दौऱ्याचे समन्वय साधले तर स्टार अॅग्रो कंपनीचे विद्यार्थ्यांच्या वतीने उपस्थित प्राध्यापकांनी आभार मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    Pachora : पाचोर्‍यात वॉटर हिटरचा शॉक फर्निचर कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

    March 11, 2026

    Jalgaon: जळगावात वडिलांच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी घरकुल चौकात गोळीबार

    March 11, 2026

    Jalgaon : जळगावात एचपीव्ही लसीकरण मोहिमेची धडक सुरुवात १४ वर्षांखालील मुलींना मोफत लस

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.